Jacqueline Fernandez | तुरुंगातील आरोपीसोबत जॅकलिन हिची रंगली लव्हस्टोरी; ‘ते’ फोटो समोर आल्यानंतर…

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या आरोपीवर जॅकलीन फर्नांडीस हिचा कसा जडला जीव? त्याने अभिनेत्रीवर केला कोट्यवधींचा खर्च आणि...

Jacqueline Fernandez | तुरुंगातील आरोपीसोबत जॅकलिन हिची रंगली लव्हस्टोरी; ते फोटो समोर आल्यानंतर...
| Updated on: Aug 11, 2023 | 12:53 PM

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर गेल्या अनेक दिवसांपासून २०० कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्ली येथे तुरुंगात बंद आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सुकेश याने जॅकलिन हिच्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. एवढंच नाही तर, आता देखील सुकेश तुरुंगातून जॅकलिन हिच्यासाठी प्रेमपत्र लिहित असतो. सध्या सर्वत्र सुकेश आणि जॅकलिन यांच्या लव्हस्टोरीची चर्चा रंगत आहे. सुकेश आणि जॅकलिन यांची ओळख कशी झाली याबद्दल अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेवू..

इव्हेंट मॅनेजर पिंकी इराणी हिने सुकेश आणि जॅकलिन यांची ओळख करुन दिली. मीडिया रिपोर्टनुसार, २०२१ मध्ये जॅकलिन हिचा मेकअप आर्टिस्ट शान याला एक फोन कॉल आला. तो कॉल एन्जल म्हणजे पिंकी हिचा होता. पिंकी हिच्या माध्यमातून शान आणि सुकेश यांची व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर शान याने जॅकलिन हिला सुकेश याचा फोन नंबर दिला.

सुरुवातील जॅकलिन सुकेश याच्यासोबत बोलत नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, अखेर सुकेश याने पिंकीच्या माध्यमातून जॅकलिन हिला महागड्या भेटवस्तू पाठवण्यास सुरुवात केली. सुकेश याने स्वत:ची ओळख गृह मंत्रालयातील अधिकारी अशी करून दिली. या कॉलनंतर शानने सुकेशचा नंबर जॅकलिनला दिला. सुकेश आणि जॅकलीन एका व्हॉट्सअॅप कॉलवरून बोलू लागले.

महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीला सुकेश याने स्वतःचं नाव रत्न वेला असं सांगितलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकेशने स्वतःला सन टीव्हीचा मालक असल्याचं देखील सांगितलं होतं. सुकेश जेव्हा जॅकलिन सोबत बोतल होता, तेव्हा तो तुरुंगातच होता. दरम्यान, एकदा सुकेश चंद्रशेखर पॅरोलवर बाहेर आला.

जून २०२१ मध्ये जॅकलीन आणि सुकेश यांची भेट झाली होती. चेन्नईत येण्यासाठी सुकेश याने जॅकलिन हिच्यासाठी चार्टर्ड विमान पाठवलं होतं. चेन्नईतील हयात हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली. अभिनेत्री दुसऱ्या दिवशी खासगी जेटने मुंबईला परतली. या भेटीनंतर आठवडाभराने दोघेही पुन्हा भेटले. दोघांची शेवटची भेट ८ ऑगस्ट २०२१ रोजी झाली होती.

दोन महिन्यांमध्ये दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर सुकेश याने अभिनेत्रीवर भेटवस्तूंचा वर्षाव केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकेशने जॅकलिनवर ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला होता. सुकेशने अभिनेत्रीला महागडे दागिने, चार पर्शियन मांजरी आणि ५७ लाख रुपयांचा घोडा भेट म्हणून दिला होता. याशिवाय जॅकलिनच्या कुटुंबीयांना भेटवस्तूही सुकेश याने दिल्या होत्या.

पण सुकेश याच्यासोबत मैत्री करणं अभिनेत्रीला महागात पडलं. सुकेश चंद्रशेकर याच्या २०० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात ऑगस्ट २०२१ मध्ये पहिल्यांदा जॅकलिनचे नाव समोर आले. त्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. दोघांचे खासगी फोटो देखील समोर आले होते. पण यावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला.

एवढंच नाही तर, ईडीने अभिनेत्रीला समन्स बजावून चौकशी सुरू केली. काही दिवसांनंतर प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेही हिचं देखील नाव आलं. ज्यामुळे सर्वक्ष खळबळ माजली होती. तर सुकेश अद्यापही तुरुंगात आहे.