Nayyi Navelli : यामी गौतमच्या ‘नई नवेली’ मध्ये जॅकलिन फर्नांडिसची सरप्राइज ENTRY, कसा आहे कॅमिओ ?
Nayyi Navelli : यामी गौतमच्या ‘नई नवेली’ चित्रपटाच्या फर्स्ट डे कलेक्शनची सगळेच वाट बघत आहेत. या चित्रपटातील जॅकलिनच्या कॅमिओची जोरदार चर्चा आहे.

Nayyi Navelli : आजकाल अनेक फिल्म्समध्ये विविध सेलिब्रिटींचा कॅमिओ असतो. अनेक मेकर्स हा फंडा वापरतात. कधीकधी एखाद्या चित्रपटात कॅमिओची गरजही नसते, तरी जबरदस्ती त्यात ॲड केलं जातं. सध्या रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ मधील ऋतिक रोशनच्या कॅमिओची जोरदार चर्चा आहे. याचदरम्यान अभिनेत्री यामी गौतमचा ‘नई नवेली’ चित्रपटही चर्चेत आहे. या चित्रपटाला जरी खास रिव्ह्यू मिळाले नसले तर, त्यातील एक कॅमिओबद्दल मात्र बरंच बोललं जात आहे. हो, हे खरं आहे. यामी गौतमच्या ‘नई नवेली’ चित्रपटात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची सरप्राइज एंट्री आहे.
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, ‘नई नवेली’ चित्रपटात जॅकलीन फर्नांडिसचा महत्वाचा आणि खूप मजेदार कॅमिओ आहे. या चित्रपटात ती अगदी काही मिनिटांसाठीच दिसते खरी, पण तेवढ्या वेळात तिने प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन केलंय.
कसा आहे जॅकलिनचा कॅमिओ ?
‘नई नवेली’ चित्रपटात जॅकलीनच कॅमिओ अगदी छोटासा, काही काळासाठीच आहे. मात्र, तो अशा प्रकारे साकारण्यात आला आहे की प्रेक्षकांच्या मनावर त्याची खोल छाप उमटते. हा केवळ प्रमोशनसाठी चित्रपटात समाविष्ट केलेला भाग नाही, तर जॅकलिनच्या उपस्थितीला चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण दृश्यात गुंफण्यात आलं आहे. हे दृश्य चित्रपटातील सर्वात खास खुलाशांपैकी एक ठरते.
दुसऱ्यांदा यामीसोबत करत्ये काम जॅकलिन
यामी गौतम आणि जॅकलीन फर्नांडिस मोठ्या पडद्यावर एकत्र दिसण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्या दोघी ‘भूत पुलिस’ मध्ये एकत्र झळकल्या होत्या, 2021 सली हा चित्रपट रिलीज झाला होता. ‘नई नवेली’ प्रमाणेच तो चित्रपटदेखील हॉरर-कॉमेडी होता. खरंतर, ‘भूत पुलिस’ फिल्ममध्ये सैप अली खान, अर्जुन कपूर आणि जावेद जाफरी हे देखील दिसले होते. तर नुकत्चाय रिलीज झालेल्या ‘नई नवेली’ मध्ये यामी गौतम व्यतिरिक्त, आदिनाथ कोठारे, अनुराग ठाकुर, सुनीता राजवार आणि इतर अनेक कलाकार आहेत.
यंदा कोणकोणत्या चित्रपटात झळकली जॅकलिन ?
वेलकम टू द जंगल नंतर जॅकलिन आता या चित्रपटाचा पार्ट आहे. या चित्रपटात तिचा फक्त एक छोटासा कॅमिओ आहे. गेल्या वर्षी ती हाउसफुल 5 आणि सोनू सूद याच्या ‘फतेह’ मध्ये झळकली होती. तसेच रेड 2 चित्रपाटच्या ‘मनी मनी’ गाण्यातही जॅकलिन दिसली होती.
