Janhavi Killekar: मला बिस्लेरीच्या पाण्यानं आंघोळ करावी लागली…जान्हवी किल्लेकरवर अशी वेळ का ओढवली?
Janhavi Killekar Kolhapur : जान्हवी किल्लेकर हिने सायको रंगा चित्रपटाच्या प्रमोशना दरम्यान कोल्हापूरातील एका प्रसंगाबद्दल बोलून दाखवले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ‘ सायको रंगा ‘ या मराठी चित्रपटाची बरीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकारही दिसणार आहेत. सिनेमात स्मिता गोंदकर, जान्हवी किल्लेकर , सुबोध भावे, पुष्कर जोग, मिलिंद शिंदे अशा कलाकार झळकणार आहेत. याच सिनेमाचे प्रमोशन सध्या सुरु आहे. या प्रमोशन निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवी किल्लेकरने शूटिंग दरम्यानच्या काही एक किस्सा बोलून दाखवला ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
सिनेमाबद्दल बोलत असताना जान्हवीने सांगितले की, “मी कोल्हापुरात शूटिंग करताना बिस्लेरीच्या पाण्यानेच अंघोळ करते.” तिने सांगितलेला किस्सा आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेता पुष्कर जोग याने या सिनेमाबद्दल आधी ही बऱ्याच गोष्टी बोलून दाखवल्या होत्या.
“कोल्हापुरमध्ये शूटिंग होते तेव्हा टेन्शन आले होते. कारण मला स्क्रीन प्रॉब्लेम खूप आहेत. मी फूडी नाहीये, पण बाहेर कुठे गेलात तर तिथले क्लायमेट मला लगेच सूट होत नाही. कोल्हापूरचे पाणी मला सूट होचत नाही. मुंबईच्या पाण्याची आता सवय झालीये ना. तर आता कसे मॅनेज करतायत, असे वाटले होते. मी अंघोळ चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली. कोल्हापूरचे पाणी चांगलेच आहे पण आपली स्कीनच अशी आहे, त्याला आता काय करायचे? मोठे मोठे पाण्याचे बॉटल आणायचे, तेही मी माझ्या खर्चातून.” असं ती म्हणाली.
दरम्यान, मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपट प्रदर्शित होत आहे. याच मालिकेमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ‘सायको रंगा’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. दमदार अॅक्शन, गूढ कथानक आणि भावनिक संघर्षाची जोड असलेला हा सिनेमा लोकांचे मनोरंजन करेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटातील मुख्य पात्र ‘रंगा’ हा अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला एक रोबिन हूड पद्धतीचा नायक म्हणून दाखवण्यात आला आहे. तो नक्की ‘सायको’ आहे की परिस्थितीने त्याला तसं बनवलंय, हे आता चित्रपट पाहिल्यावरच समजेल.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us