AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan : ते राजा आणि आम्ही रंक…अमिताभ बच्चन यांनी गांधी कुटुंबियांबद्दल केलेलं वक्तव्य, काय घडलेलं?

Amitabh Bachchan On Rajiv Gandhi Family : एकेकाळी बच्चन कुटुंबीय आणि गांधी कुटुंबीय यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते. मात्र, अचानक दोन्ही कुटुंबात दरी निर्माण झाली. काय घडलेलं? जाणून घ्या.

Amitabh Bachchan : ते राजा आणि आम्ही रंक...अमिताभ बच्चन यांनी गांधी कुटुंबियांबद्दल केलेलं वक्तव्य, काय घडलेलं?
| Updated on: Nov 10, 2026 | 6:52 PM
Share

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि गांधी कुटुंब यांच्यात एकेकाळी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीची उदाहरणं दिली जायची. इतकंच नाही तर सोनिया गांधी भारतात पहिल्यांदा आल्या, तेव्हा बच्चन कुटुंबानं त्यांना आपल्या घरात मुलीप्रमाणे स्थान दिलं होतं. मात्र, कालांतरानं या दोन कुटुंबांमधील संबंध बिघडले आणि दोन्ही कुटुंबांमध्ये मोठी दरी निर्माण झाली. आता सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकाच्या निमित्तानं या जुन्या मैत्रीची आणि त्यातील दुराव्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सोनिया गांधी भारतात आल्या तेव्हा बच्चन कुटुंबानं दिला होता आधार

सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात जानेवारी १९६८ मध्ये भारतात आल्याचा अनुभव सांगितला आहे. १३ जानेवारी १९६८ रोजी पहाटे त्या दिल्ली विमानतळावर दाखल झाल्या होत्या. त्यावेळी राजीव गांधी, त्यांचे भाऊ संजय गांधी आणि मित्र अमिताभ बच्चन त्यांना घेण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. सोनिया भारतात आल्यानंतर त्या काही काळ अमिताभ बच्चन यांचे वडील आणि प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन तसेच आई तेजी बच्चन यांच्या घरी राहिल्या. इंदिरा गांधी आणि बच्चन कुटुंबाचे जुने कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे सोनिया यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि राहणीमान समजून घेण्यासाठी बच्चन कुटुंबाने आपुलकीने मदत केली. सोनिया गांधी यांनी तेजी बच्चन यांचा उल्लेख प्रेमळ आणि आधार देणाऱ्या व्यक्ती म्हणून केला आहे. त्या आपल्यासाठी आईसारख्या होत्या, असंही त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलं आहे.

हरिवंशराय बच्चन यांनी सोनिया गांधींना दिला होता महत्त्वाचा सल्ला

सोनिया गांधी हरिवंशराय बच्चन यांना प्रेमाने ‘अंकल बच्चन’ म्हणत असत. ते त्यांना अधूनमधून हिंदी भाषेतील काही शब्द शिकवत असत. त्याचबरोबर त्यांनी सोनिया यांना एक महत्त्वाचा सल्लाही दिला होता. ‘या देशात तुम्ही प्रत्यक्षात काय आहात, यापेक्षा लोक तुम्हाला काय समजतात, याला अधिक महत्त्व असतं,’ सुरुवातीला सोनिया यांना या सल्ल्याचा नेमका अर्थ समजला नव्हता. मात्र, पुढील आयुष्यात त्यांना या शब्दांचं महत्त्व जाणवलं, असं त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीत आली दरी

एकेकाळी राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री देशभरात चर्चेचा विषय होती. दोन्ही कुटुंबांमध्ये नियमित येणं-जाणं होतं. त्यांचे संबंध केवळ राजकीय किंवा व्यावसायिक नव्हते, तर कौटुंबिक जिव्हाळ्याचे होते. मात्र, कालांतराने या नात्यात दुरावा निर्माण झाला. या मैत्रीत दरी निर्माण होण्यामागे अनेक कारणं सांगितली जातात. त्यापैकी बोफोर्स प्रकरण हे एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. या वादाच्या काळात बच्चन कुटुंबानं कठीण परिस्थितीत गांधी कुटुंबाला अपेक्षित साथ दिली नाही, अशी नाराजी निर्माण झाल्याचं वृत्त आहे. अमिताभ बच्चन यांनीही एका वेळी ‘ते राजा आहेत आणि आम्ही रंक आहोत,’ असं विधान केल्याचं सांगितलं जातं. तसंच जया बच्चन यांचीही गांधी कुटुंबाबद्दल नाराजी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. गांधी कुटुंबातील लोकांनी आपल्या पतीला दुखावल्याची भावना त्यांनी व्यक्त केल्याचं वृत्त होतं.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?