धुरंधर आणि टॉक्सिकचा रेकॉर्ड धोक्यात? ‘जेलर 2’ पहिल्याच दिवशी करणार 140 कोटींची कमाई? अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे आकडे समोर

रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ची बॉक्स ऑफिसवर तुफान चर्चा. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कोट्यवधींची कमाई. पहिल्या दिवशीच करणार 140 कोटींची कमाई? जाणून घ्या सविस्तर

धुरंधर आणि टॉक्सिकचा रेकॉर्ड धोक्यात? जेलर 2 पहिल्याच दिवशी करणार 140 कोटींची कमाई? अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे आकडे समोर
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 14, 2026 | 9:06 PM

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या बहुप्रतीक्षित ‘जेलर 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 15 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये दमदार कामगिरी केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई

Loading...

‘जेलर 2’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला 10 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. काही परदेशी बाजारपेठांमध्ये बुकिंग यापूर्वीच सुरू झाले होते. उपलब्ध आकडेवारीनुसार, 14 ऑक्टोबरपर्यंत चित्रपटाच्या जगभरातील अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई झाल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः परदेशातील प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आहे. मात्र, हिंदी डब आवृत्तीच्या बुकिंगमध्ये अद्याप अपेक्षित उत्साह दिसत नसल्याचेही अनेक बात्यांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई होणार?

‘जेलर 2’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. चित्रपटाला दक्षिण भारतात दमदार ओपनिंग मिळण्याची शक्यता असून, जगभरातील कमाई 125 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकते, असा अंदाज काही बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. काही अंदाजांनुसार, ही कमाई 140 कोटी रुपयांपर्यंतही पोहोचू शकते. मात्र, हे केवळ अंदाज असून प्रत्यक्ष कमाई चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

हृतिक रोशनच्या कॅमिओचीही चर्चा

या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा कॅमिओ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही चित्रपटाबाबत उत्सुकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रजनीकांत यांची लोकप्रियता, चित्रपटाचा पहिला भाग आणि परदेशातील प्रतिसाद यामुळे ‘जेलर 2’ बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ‘जेलर 2’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगबाबत समोर येणारे आकडे आणि पहिल्या दिवसाच्या कमाईचे अंदाज यामुळे चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता रजनीकांत यांचा हा चित्रपट प्रत्यक्षात किती कमाई करतो आणि बॉक्स ऑफिसवर कोणते नवे विक्रम नोंदवतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us