Janhavi Killekar: बिस्लेरीने अंघोळीचा वाद चिघळला, जान्हवीने मोजले लाखो रुपये, खराब स्किनचे फोटो पोस्ट करत स्पष्टच म्हणाली…

Janhavi Killekar: 'कोल्हापूरला गेल्यानंतर बिस्लेरीने अंघोळ करायची...', अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्या या वक्तव्यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं. अशात जान्हवीने यावर चांगलंच सुनावलं आहे. खराब स्किनचे फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी हिच्या व्हिडीओची चर्चा सुरु आहे.

Janhavi Killekar: बिस्लेरीने अंघोळीचा वाद चिघळला, जान्हवीने मोजले लाखो रुपये, खराब स्किनचे फोटो पोस्ट करत स्पष्टच म्हणाली...
Janhavi Killekar
| Updated on: Oct 02, 2026 | 9:33 AM

Janhavi Killekar: ‘बिग बॉस मराठी 5’मधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या तिच्या एका मुलाखतीनंतर प्रचंड चर्चेत आहे. कोल्हापूरला गेल्यानंतर स्किनचा त्रास असल्याने बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ करायचे.. असं वक्तव्य जान्हवी हिने केलं. त्यानंतर अभिनेत्री मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं. यावर आता जान्हवीने व्हिडीओ पोस्ट करत ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. दोन भागात व्हिडीओ पोस्ट करत जान्हवी म्हणते. ‘खरं तर मला हा व्हिडीओ अजिबात बनवायचा नव्हता. पण आपल्या समजात माणुसकी इतकी ढासळत चालली आहे. स्वतःचे चार व्ह्यूज, लाईक्स वाढवण्यासाठी, फॉलोअर्स वाढवण्यासाठी एखाद्या स्त्रीचा कितीही अपमान केला, तरी चालणार आहे… ज्या ज्या लोकांनी माझ्या नावाने व्हिडीओ बनवले आहे. त्यांचे मनापासून आभार… आणि राहिला प्रश्न माझा, बिस्लेरीच्या व्हिडीओचा तर मला असं वाटतं की, तुम्ही फक्त रिल पाहिली आहे, जी काही सेकेंदाची असते. तर हे अर्थ सत्य आहे, अर्ध्या हळदीने पिवळी झालेली माणसंच असे व्हिडीओ बनवत आहे… असो..

पुढे जान्हवी म्हणते, विषय समजण्यासाठी तुम्हाला पूर्ण पॉडकास्ट पाहावा लागेल. त्यामध्ये मी सर्वकाही सांगितलं आहे. सांगायचं झालं जान्हवी हिला त्वचेच्या काही समस्या आहे, ज्यामुळे तिला पूर्ण काळजी घ्यावी लागते. एवढंच नाही तर, जान्हवीने काही फोटो देखील दाखवले, जे आजपर्यंत कधीच समोर आले नाही. ज्यामध्ये तिची खराब स्किन दिसत आहे.

Loading...

 

फोटोंबद्दल सांगत जान्हवी म्हणाली, ‘2020 ची गोष्ट आहे, मालिकेच्या शुटिंगसाठी मी एका ठिकाणी राहत होते, पुण्याबाहेर शुटिंग सुरु होतं. सुरुवातीला माझ्या चेहऱ्याला काहीही झालं नाही. मालिकेसाठी शुटिंग जवळपास दीड वर्ष असतं. महिन्याभरात माझा फेस पूर्ण पिंपल्सने भरला. मी डॉक्टरांकडे गेले. त्यांनी मला सांगितलं, तुम्हाला पाणी सूट होत नसणार… असं अनेकदा होतं आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला पाणी सूट होत नाही. ही गोष्ट फक्त सेलिब्रिटींना लागू होत नाही. हे सगळ्यांना लागू होतं… ‘ पुढे जान्हवीने तिचे काही फोटो दाखवले…

 

 

जान्हवीचा चेहरा पूर्ण पिंपलने भरलेला होता. ज्यामुळे मालिकेत मेकअपने ते पिंपल्स लपवले जात होते. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘डॉक्टरांनी मला सांगितलं, तुम्हाला पाण्याचा त्रास होतोय. लहानपणापासून तुम्ही शहरात वाढलेल्या आहात. त्यासाठी मला मालिका सोडावी लागली आणि त्वचा चांगली करण्यासाठी लाखो रुपये मोजले आहेत, माझी ऐपत नसताना… मी एक अभिनेत्री आहे, मला छान दिसायचं आहे. त्याच्यामुळे मी काही गोष्टी पाळते…’

पुढे संतापात जान्हवी म्हणते, ‘बिस्लेरीची बाटलीमुळे ट्रोल करत आहे. असा कितीला येतो तो पाण्याचा बाटला… 70 – 80 रुपयांमध्ये.. काय एवढं महाग आणि खर्चीक केलं मी? कोल्हापूरच्या पाण्याचा प्रश्न असेल तर, तेथील पाणी चांगलंच आहे… हे मी त्या व्हिडीओमध्ये सुद्धा बोलली आहे..’, ‘कोल्हापूरचं पाणी चांगलंच आहे, आपली स्किन वाईट आहे, त्याचं काय करणार…’ असं जान्हवी म्हणालेली.

‘मी फक्त एक किस्सा सांगत होती. पण अर्थाचा तुम्ही जो अनर्थ केला आहे. आपल्या कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा वारसा लाभला आहे आणि शिवभूमीवर महाराजांनी परक्या स्त्रीला देखील आई – बहिणीसारखा मान दिला… अशा महाराजांची शिकवण असलेलं आपलं कोल्हापूर, कोल्हापुरातील माणसं काय करत आहेत? एखाद्या स्त्रीला घालून पाडून बोलत आहेत… ते असं फक्त त्यांचे चार व्ह्यूज वाढवे म्हणून करत आहेत.’ असं देखील जान्हवी संतापात म्हणाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us