
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन हे नेहमी त्यांच्या रागीट स्वभावामुळे ओळखल्या जातात. अनेकदा फोटो काढण्यावरून त्या चाहते आणि पापाराझींवर चिडलेल्या पाहायला मिळतात. त्यांचे हे व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांना नेटकऱ्यांनी अनेकदा ट्रोलही केलं आहे. मात्र जया बच्चन यांचा असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये कॅमेरा पाहून अनेकदा रागावणाऱ्या जया बच्चन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या हसताना दिसत आहेत आणि पापाराझींना फोटो काढण्यापासूनही रोखत नाहीत. व्हिडिओमध्ये जया बच्चन स्वतःच्या वागण्यावर किंवा त्यांच्या रागवण्यावर त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत.हा व्हिडीओ पाहून तर सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
हसून पॅप्ससमोर फोटोसाठी पोज दिली
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जया बच्चनचा हा व्हिडिओ जुना आहे. जया बच्चन अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, जिथे त्यांनी हसून पॅप्ससमोर फोटोसाठी पोज दिली आणि कॅमेरे पाहून त्या पॅप्सकडे गेल्या आणि त्यांचा राग व्यक्त करण्याचं कारण सांगितलं पण तेही हसत.
मी फोटो द्यायला तयार असते पण….
नेहमीप्रमाणे, पापराझी जया बच्चन यांचे फोटो काढण्यासाठी तयार होते. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, नाराजी दाखवण्याऐवजी, जया यांनी फार प्रेमाने पापाराझींना समजावलं. त्यांनी केवळ पोजच दिली नाही तर त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या स्वभावाबद्दलचा मुद्दाही मांडला. व्हिडिओमध्ये जया म्हणताना दिसतात, ‘आता काय,कोणतेही कार्यक्रम असेलना तेव्हा मी फोटो देण्यास तयार असते. पण जेव्हा काही वैयक्तिक कारण असतं किंवा पर्सनल कारण असतं तेव्हा तुम्ही लोक लपून वैगरे फोटो काढता, मला ते आवडत नाही.’
“मी तयार झाल्यावर, मग काही हरकत नाही…”
जयाचे हे शब्द ऐकल्यानंतर, जेव्हा एका पापाराझीने त्याच्यासोबत असलेल्या एकाला इनफॉर्मल चॅट रिकॉर्ड बंद करण्यासाठी सांगितलं. तेव्हा देखील जया यांनी देखील हसत त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला आणि पुढे म्हणाल्या, ‘जेव्हा मी छान तयार होऊन आलेली असते, तेव्हा काही हरकत नाही… जेव्हा मी तयार नसते आणि तुम्ही लोक फोटो काढता, तेव्हा…मग माझे रंग बाहेर येतात.’ असं म्हणत त्या हसताना दिसल्या.
लोक जया बच्चन यांची खिल्ली उडवत आहेत.
जया बच्चन यांचा हा यू-टर्न पाहून सोशल मीडियावर युजर्स खूप प्रतिक्रिया देत आहेत. जया बच्चन यांच्यातील हा बदल नेटकऱ्यांसाठीही नक्कीच नवीन होता. हा व्हिडीओ भलेही जुना असो. पण जया बच्चन या एवढ्या प्रेमाने वागू शकतात यावर कोणाचाच विश्वास बसत नसल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. अनेक युजर्सनी असेही म्हटले की, “कदाचित तिच्या सुपरस्टार पतीने तिला हे समजावून सांगितले असेल”, तर एका युजरने लिहिले ‘अमिताभ बच्चनने क्लास घेतला आहे का?’. आणखी एका युजरने लिहिले ‘अखेर त्यांना चांगली बुद्धी मिळाली तर…’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तसेच नेटकऱ्यांनी जया बच्चन यांनी पुढेही असंच छान वागावं अशी अपेक्षा केली आहे.