
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान , करीना कपूर हे सेलिब्रेटी आहेत त्याचपद्धतीने त्यांचे दोन्ही मुलं देखील कायम चर्चेत असतात. ते देखील सेलिब्रेटी किड्सच आहेत. या दोघांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आताही सोशल मीडियावर करीनाचा धाकटा मुलगा जेहचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अलीकडेच बांद्रा इथे खरेदी करण्यासाठी सैफ अली खान गेला होता तेव्हा त्याचा धाकटा मुलगा जेहचा एक गोड व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जेह वडील सैफची अशी घेत होता काळजी
जेह चक्क वडील सैफ अली खानच्या सुरक्षेची अगदी बॉडीगार्डसारखी काळजी घेताना दिसला. सैफ अली खान प्रत्यक्षात त्याची मुले जेह आणि तैमूरसह खरेदीसाठी बाहेर होता, त्यादरम्यान त्याचा धाकटा मुलगा त्याच्या अंगरक्षकाच्या शैलीत पापाराझींना त्याच्या वडिलांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसला. जेहची त्याच्या वडिलांची काळजी घेतानाचा तो गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता ही क्लिप इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
पापाराझींना थांबवण्याचा प्रयत्न केला
व्हिडिओमध्ये जहांगीर अली खान दूरवरून धावत येताना दिसतो आणि दोन्ही हात पुढे करून पापाराझींना थांबवण्याचा प्रयत्न करतो. सैफ अली खानच्या सहाय्यकाने त्याला उचलून गाडीत बसवल्यानंतरही, तो गाडीत बसल्यानंतरही त्याच्या वडिलांचे फोटो न काढण्याचा इशारा करताना दिसत आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याचे कुटुंब त्याच्याबद्दल अत्यंत चिंतेत असतं. सैफच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायम अलर्ट राहताना दिसतात.
व्हिडीओवर कमेट्सचा भडीमार
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट केली की, “छोटे बाबा त्यांच्या मोठ्यांना फोटो काढण्यापूर्वी परवानगी घेण्यास शिकवत आहेत.” दुसऱ्याने लिहिले, “ही गोंडसता रोखणे कठीण आहे.” एका फॉलोअरने व्हायरल व्हिडिओवर कमेंट केली की, “हे बाळ करीना कपूर खानचे प्रो मॅक्स व्हर्जन आहे.” तर एकाने लिहिले, “हे बाळ नाहीये, हे बेबो 2.0 वर्जन आहे.” या व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अनेक कमेंट केल्या आहेत.