
Jhimma 3 : ‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’ नंतर आता ‘झिम्मा’ सिनेमाचा तिसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सांगायचं झालं तर, ‘झिम्मा’ सिनेमाचे दोन्ही भाग पाहिल्यानंतर अनेक महिलांनी बॅगा भरल्या आणि सहलीला निघाल्या… आता महिलांना ‘झिम्मा’ सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे.. दिग्दर्शक हेमंत ढोमे दिग्दर्शित सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं… आता ‘झिम्मा’ सिनेमाचा तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार याच प्रतिक्षेत चाहते आहेत… हेमंत याच्या वाढदिवशी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनातील उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर हेमंत याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक मराठी अभिनेत्रींनी हेमंत याच्या पोस्टवर कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.
‘झिम्मा 3’ सिनेमाची घोषणा करत हेमंत याने कॅप्शनमध्ये, ‘आपला आनंदाचा खेळ ‘यावेळी तिसराच आहे’!!! झिम्मा ३’, असं लिहिलं आहे. यावर कमेंट करत अभिनेत्री वैदेही परशुरामी म्हणाली, ‘वाह… वाह… राडा…’, तर अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी यांनी देखील कमेंट केली आहे. सिनेमाच्या दोन्ही भागात सायली हिने भन्नाट भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता तिसऱ्या भागात काय कमाल प्रेक्षकांना अनुभवता येणार… याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘झिम्मा 3’ सिनेमाची घोषणा करत हेमंत याने अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याचा एका फोटो पोस्ट केला आहे. अभिनेत्याच्या फोटो भोवती अनेक बॅग्स पडलेल्या दिसत आहे… सुटकेसेस, क्रिकेट बॅट आणि तो सूर्यफूल… यामुळे यावेळी देखील काहीतरी ट्विस्ट सिनेमात असेल असं दिसत आहे… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘झिम्मा 3’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
‘झिम्मा 3’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, हेमंत ढोमे दिग्दर्शिक सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी अभिनेत्री क्षिती जोगची आहे… सिनेमा 1 जानेवारी 2027 मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे… त्यामुळे 2027 या नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार सिनेमाने होणार असं म्हणायला हरकत नाही.