Jeetendra : माझा मुलगा म्हणजे संत…जितेंद्र कपूर यांनी केलं लेकाचं भरभरून कौतुक

माझा मुलगा म्हणजे संत, माझा मुलगा माझ्यासाठी आदर्श आहे , तो माझ्यापेक्षाही चांगला अभिनेता आहे . मुलाच्या वाढदिवसानिमित्त जितेंद्र कपूर यांनी केलं मुलाचं भरभरून कौतुक आहे. तसेच काम करत राहण्याची इच्छा अजूनही कायम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Jeetendra :  माझा मुलगा म्हणजे संत...जितेंद्र कपूर यांनी केलं लेकाचं भरभरून कौतुक
| Updated on: Nov 24, 2026 | 6:55 PM

अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता तुषार कपूर नुकताच वयाची 50 वर्षे पूर्ण केली. त्याच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टी आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने जितेंद्र यांनी आपल्या मुलाच्या स्वभावापासून त्याच्या अभिनयापर्यंत अनेक गोष्टीवर भाष्य केलं आहे. तुषारला आयुष्यातील शिस्त आणि मुलगा लक्ष्यसोबत घालवलेला वेळ याचं त्यांनी विशेष कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी तुषारला संत असंही म्हटलं आहे.

तुषार कधीच दारू पीत नाही सिगारेट ओढत नाही.

जितेंद्र यांनी आपल्या मुलाचं कौतुक करताना स्वत:च्या तरूणापणाच्याही आठवणी सांगितल्या आहेत. तरूण वयात आपल्याला स्मोकिंग आणि मद्यपानाच्या सवयी होत्या. रात्री उशिरापर्यंत जागण्याचीही सवय होती. असं त्यांनी सांगितलं. मात्र तुषार यापेक्षा वेगळा आहे. तो दारू पीत नाही. सिगारेट ओढत नाही आणि रात्री उशिरापर्यंत जागतही नाही. काम नसताना मिळणारा वेळ तो मुलगा लक्ष्यसोबत घालवतो. तुषार केवळ जगासाठीही नाही, तर आपल्यासाठीही आदर्श पॉलत असल्याचं जितेंद्र यांनी सांगितलं.

Loading...

मुलाच्या बालपणात वेळ देता आला नाही याची खंत

तुषार आणि एकता कपूर लहान असताना आपण कामात खूप व्यस्त होतो अशी आठवण जितेंद्र यांनी सांगितली. साऊथच्या चित्रपटांच्या शूटिंगसाठी ते चेन्नई आणि हैद्राबादमध्ये बराच काळ असायचे. त्यामुळे मुंबईतील घरी मुलांसोबत वेळ घालवता येत नव्हता. सुट्टीच्या काळात मुलं भेटायला यायची तेवढीच त्यांची भेट व्हायची.

आज तुषार आपल्या मुलासोबत भरपूर वेळ घालवताना दिसतो. तेव्हा स्वत:ला मुलांच्या बालपणात पुरेसा वेळ देता आला नाही,याची खंत वाटते. असं जितेंद्र यांनी सांगितलं. कामाचं कारण देऊन या गोष्टीचं समर्थन करता येणार नाही. असंही ते म्हणाले ही खंत आयुष्यभर राहिलं. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

जितेंद्र म्हणाले ,तुषार माझ्यापेक्षा चांगला अभिनेता,

तुषारच्या अभिनयाबद्दल बोलताना जितेंद्र यांनी त्याला स्वत:पेक्षा चांगला आणि अधिक समर्पित अभिनेता म्हटलं. हे केवळ मुलगा आहे म्हणून सांगतोय असं नाही. असंही त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या कारकिर्दिला यश मिळण्यामागे नशीब आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी दिलेली संधी महत्त्वाची होती. असं जितेंद्र यांनी सांगितलं.

एकता कपूरचंही केलं कौतुक

मुलगी एकता कपूरच्या कामाचंही जितेंद्र यांनी कौतुक केलं. ती चित्रपट आणि मालिकांची निर्मीती करण्यासोबतच सामाजिक कार्य करते आणि वृद्धाश्रमही चालवते. याचा आपल्याला अभिमान आहे. तुषारला त्यांनी आपल्या बांधकाम व्यवसायातही सहभागी करून घेतलं आहे. असे जितेंद्र म्हणाले

पाठदुखीच्या शस्त्रक्रियेनंतरही काम करण्याची इच्छा

जितेंद्र यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. नुकतीच पाठदुखीची शस्त्रक्रिया झाली असून त्यातून सावरण्यास वेळ लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र काम करत राहण्याची इच्छा अजूनही कायम आहे. मला काम करत असतानाच शेवटचा श्वास घ्यायचा आहे. अशा अर्थांचं विधानंही त्यांनी केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us