
चित्रपटांपासून टीव्ही शोजमध्ये काम करणारी अभिनेत्री शेफाली जरीवाला आता आपल्यामध्ये नाहीय. शेफालीच शुक्रवारी निधन झालं. वयाच्या 42 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. ही बातमी सर्वांसाठीच धक्कादायक आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूच कारण हार्च अटॅक सांगितलं जातय. ही बातमी समोर आल्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. शेफाली ‘कांटा लगा’ गाण्यामुळे फेमस झाली. शेफाली जरीवाला तिचा फिटनेस आणि ग्लॅमर अंदाजासाठी ओळखली जायची. मॉडेल राहिलेली शेफाली आपल्या खासगी आयुष्याबद्दल खूप प्रायव्हेट होती. तिच्याशी संबंधित 5 गोष्टी जाणून घ्या, ज्या फारच कमी लोकांना माहित आहेत.
पहिली गोष्ट : ‘कांटा लगा’ गाण्यामुळे एकारात्रीत स्टार बनलेल्या शेफालीच्या करिअर ग्राफमध्ये दुसरं कुठलं मोठ गाणं किंवा चित्रपट नाहीय. सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या ‘मुझसे शादी करोगी’ गाण्यामधून शेफालीला फेम भरपूर मिळाला. पण तिला कांटा लगा इतकं दुसरं पॉप्युलर गाणं मिळालं नाही. ना चित्रपट मिळाला.
दुसरी गोष्ट : शेफाली जरीवालाचा जन्म 24 नोव्हेंबर 1982 रोजी गुजरातमध्ये झाला. शेफालीला सुरुवातीपासून बॉलिवूडमध्ये काम करायचं होतं. म्हणून संधी मिळताच आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती गुजराहून मुंबईला आली. इथे येऊन तिने अनेक म्युझिक अल्बम आणि चित्रपटात काम केलं.
तिसरी गोष्ट : एकवेळ अशी सुद्धा आली, जेव्हा शेफाली अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाली. याचा खुलासा तिने एका इंटरव्यूमध्ये केलेला. अभिनेत्रीने ई टाइम्सला सांगितलेलं की, “वयाच्या 15 व्या वर्षापासून मला आकडी यायची. त्यावेळी अभ्यासात चांगले मार्क मिळवण्याचा माझ्यावर दबाव होता. मी त्याचच टेन्शन घ्यायची. तेव्हापासून मला आकडी यायची”
चौथी गोष्ट : अनेक जण असा विचार करत असतील ‘कांटा लगा’ नंतर मी दुसरं कुठलं गाण का नाही केलं?. त्याचं उत्तर देताना तिने सांगितलं की, आकडीच्या समस्येमुळे माझ्या आत्म-सन्मानाला धक्का बसलेला. पण हळू-हळू मी स्वत:ला संभाळलं. शूटिंग दरम्यान अचानक आकडीचा झटका तर येणार नाही ना? ही भिती तिच्या मनात कायम असायची.
पाचवी गोष्ट : शेफली जरीवालाने सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधून माहिती तंत्रज्ञानमध्ये (Information Technology) मास्टर डिग्री घेतली होती. तिच्या शालेय शिक्षणाची सुरुवात सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूल, कालीम्पोंगमधून झालेली.