Kamya Punjabi : त्यानं माझ्या अंतर्वस्त्रांवर…प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला सेटवरील प्रसंग, काय घडलेलं?

Tv Actress Shares Incident : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीनं एका मुलाखतीत दिग्दर्शकावर आरोप केले असून सेटवरील प्रसंग सांगितला आहे.

| Updated on: Nov 23, 2026 | 9:35 PM
1 / 5
टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. एका मुलाखतीत अभिनेत्रीनं सेटवरील धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. एका मुलाखतीत अभिनेत्रीनं सेटवरील धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

2 / 5

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत काम्या म्हणाली की, ''कथा है दिल' ही माझी पहिली मालिका होती. मी त्या मालिकेत अमन वर्माच्या मुलीची भूमिका साकारत होते. मालिकेचा दिग्दर्शक माझ्यासकट काही कलाकारांना त्रास द्यायचा.'

3 / 5

'मला मेकअप रूममधून बाहेर पडून सेटवर जावंसंच वाटायचं नाही. मी मालिकेमुळे खूप आनंदी होते. पण, तो गंमतीनं अशा गोष्टी बोलायचा, ज्या मी शब्दातही सांगू शकत नाही.'

4 / 5

'एक शॉट होता, ज्यात मी जिन्यावरून धावत खाली येत होते आणि त्यानं माझ्या अंतर्वस्त्रांवर कमेंट केली. तो अशा गोष्टी बोलायचा, त्यामुळे मला भीती वाटायची.'

5 / 5

'सेटवर खूप मोठे कलाकार होते. मला वाटलं होतं की, मी त्यांच्याकडून काहीतरी शिकेन. पण दिग्दर्शक अशा गोष्टी बोलायचा, ज्यामुळे मला भीती वाटायची.' अस काम्या शेवटी म्हणाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us