AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना रनौत आणि मी पती – पत्नी सारखे राहीलो…, असं का म्हणला बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता?

Kangana Ranaut : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने केलेलं धक्कादायक वक्तव्य, 'कंगना रनौत आणि मी पती - पत्नी सारखे राहतो...', चर्चांना उधाण..., अभिनेत्रीनंतर खासदार म्हणून चर्चेत आलेल्या कंगना रनौत यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा... कोण आहे 'तो' अभिनेता...

कंगना रनौत आणि मी पती - पत्नी सारखे राहीलो..., असं का म्हणला बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता?
| Updated on: Jun 11, 2024 | 2:56 PM
Share

भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवलेल्या अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत कायम वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर कंगना यांनी आता स्वतःचा मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. पण एक काळ असा देखील होता जेव्हा कंगना त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या होत्या. कंगना यांच्या नावाची चर्चा देखील अनेक सेलिब्रिटींसोबत रंगली. पण कोणासोबत कंगना यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. पण एक अभिनेता म्हणाला होता की, ‘मी आणि कंगना पती – पत्नी सारखं राहातो…’

कंगना यांच्याबद्दल असं वक्तव्य करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाहीतर, अभिनेता आदित्य पंचोली होता. आदित्य आणि कंगना यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं. दोघांमध्ये तब्बल 21 वर्षाचं अंतर होतं. तेव्हा कंगना यांनी बॉलिवूडमध्ये करियरला सुरुवात केली होती. तेव्हा कंगना – आदित्य यांच्या नात्याच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता. पण ब्रेकअपनंतर आदित्य पंचोली याने अभिनेत्रीवर अनेक गंभीर आरोप लावले.

कंगना यांच्याबद्दल आदित्य म्हणाला होता, ‘कंगना हिच्यासोबत जेव्हा ओळख झाली तेव्हा अभिनेत्रीकडे एक रुपया देखील नव्हता. 2004 मध्ये माझी आणि कंगनाची ओळख झाली होती. एका मित्राने अभिनेत्रीची मदत करण्यासाठी सांगितलं होतं. जवळपास तीन वर्ष आम्ही एका घरात पती – पत्नी सारखं राहात होतो…’

कंगना रनौत यांना एक मुलगा सतत त्रास देत होता. पण त्याच मुलासोबत कंगना तब्बल अधिक काळ फोनवर बोलायची. कंगना एक महिना त्या मुलासोबत बोलत होती, ज्यावर तिने त्रास देण्याचे आरोप लावले होते. असं देखील आदित्य पंचोली म्हणाला होता.

पण कंगना यांनी देखील आदित्य पंचोली याच्यावर मारहाण करण्याचे आरोप लावले होते. स्वतःचा बचाव करण्यासाठी अभिनेत्रीने पहिल्या मजल्यावरून उडी देखील मारली होती… असं देखील कंगना एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

‘माझ्या वडिलांच्या वयाच्या पुरुषाने माझ्या डोक्यावर जोरात मारलं होतं…’ सांगायचं झालं तर, तेव्हा आदित्य पंचोली विवाहित होते. आदित्य पंचोली यांच्यानंतर देखील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत कंगना यांच्या नावाची चर्चा झाली. पण आता कंगना त्यांच्या नव्या प्रवासामुळे चर्चेत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...