AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chirag Paswan | वयाच्या 41 व्या वर्षी कॅबिनेट मंत्री, किती शिकले आहेत चिराग पासवान?

Chirag Paswan | मोदी सरकारमधील तरूण चेहरा, वयाच्या 41 व्या कॅबिनेट मंत्री, किती शिकले आहेत चिराग पासवान? सध्या सर्वत्र चिराग पासवान यांची चर्चा रंगली आहे. आता त्यांच्या जुन्या सिनेमांचे देखील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत...

Chirag Paswan | वयाच्या 41 व्या वर्षी कॅबिनेट मंत्री, किती शिकले आहेत चिराग पासवान?
Chirag Paswan
| Updated on: Jun 11, 2024 | 2:03 PM
Share

Chirag Paswan | लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वत्र हाजीपूरचे खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांची चर्चा रंगू लागली. सोशल मीडियावर देखील चिराग पासवान यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत… तर मोदी सरकारमधील तरुण मंत्री चिराग पासवान यांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊ. हाजीपूरचे खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान तुफान चर्चेत आहेत.

सोशल मीडियावर फक्त आणि फक्त  चिराग पासवान यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चिराग पासवान यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1982 मध्ये दिल्ली येथे झाला. चिराग पासवान यांनी इंजीनियरिंग ग्रेज्यूएट आहेत. राजकारण प्रवेश करण्यापूर्वी चिराग पासवान बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. पण अभिनय विश्वात त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिले ना मिले हम’ सिनेमात चिराग पासवान आणि कंगना रनौत यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली.

सिनेमांमध्ये करिअर केल्यानंतर, चिराग यांनी बिहारच्या राजकारणात प्रवेश केला आणि 2014 मध्ये लोक जनशक्ती पार्टीसाठी जमुई मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यानंतर 2019 मध्ये चिराग पुन्हा एकदा जमुई जागेवरून खासदार म्हणून निवडून आले आणि आता 2024 मध्ये मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले आहेत.

चिराग पासवान यांनी बुंदेलखंड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून कंप्यूटर सायन्समधून बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. फक्त इंजीनियरिंग नाही तर, चिराग पासवान यांनी फॅशन डिझायनिंगचा कोर्स देखील केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने 2003 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगमधून 10वी आणि 12वीपर्यंत शिक्षण घेतलं.

चिराग पासवान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते रामविलास पासवान यांचे पूत्र आहेत. यावेळी एलजेपीकडून 5 जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आणि चिराग यांनी पाचही जागा जिंकून पंतप्रधान मोदी यांना दिल्या. यामुळेच चिराग पासवान यांनी एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...