AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना राणौतने लाडूमध्ये मासिक पाळीचं रक्त मिसळून केली काळी जादू? काय आहे भानगड?

Kangana Ranaut Post: अभिनेत्री कंगना राणौत यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण एक काळ असा होता जेव्हा कंगना काळ्या जादूमुळे चर्चेत आल्या होत्या. पाळीचं रक्त लाडूत मिसळून त्यांनी काळी जादू केल्याचे आरोप करण्यात आले होते. जाणून घ्या नक्की काय आहे भानगड?

कंगना राणौतने लाडूमध्ये मासिक पाळीचं रक्त मिसळून केली काळी जादू? काय आहे भानगड?
Kangana Ranaut
| Updated on: Jan 20, 2026 | 2:07 PM
Share

Kangana Ranaut Post: बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत त्यांच्या सिनेमांमुळे कमी पण वादग्रस्त प्रकरणामुळे अधिक चर्चेत असतात. कंगना यांनी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींवर गंभीर आरोप केले आहेत. तर अनेक सेलिब्रिटींनी देखील कंगना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकदा तर, कंगना राणौत यांना काळी जादू येते आणि त्यांनी अनेकांवर काळी जादू केली आहे.. असे देखील आरोप करण्यात आले. एवढंच नाही तर, कंगना यांना अनेकांनी चेटकीण देखील म्हटलं होतं. खरंतर, बऱ्याच वर्षांपूर्वी कंगना यांनी सद्गुरूंचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये 200 वर्षांपूर्वी महिलांना चेटकीण ठरवून जिवंत जाळलं जात होतं.

कंगना राणौत सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाल्या होत्या, ‘जर तुमच्याकडे सुपर पॉवर असेल तर, तुम्हाला चेटकीण म्हणटलं जातं. मला एक चेटकीण असं म्हटलं जायचं. पण मी कधीच त्यांच्यासाठी स्वतःला उद्ध्वस्त केलं नाही. त्याऐवजी मी त्यांना…’ पुढे खिल्ली उडवत कंगना म्हणाली, ‘आबरा का डाबरा…’ व्हायला हवं…

पुढे एका इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगना यांनी लिहिलेलं, ‘2016 मध्ये, एका मुद्रित संपादकाने एक लेख लिहिला होता ज्यामध्ये दावा केला होता की त्यांच्या एका तपास पत्रकाराकडे मला काळी जादू माहित असल्याचे पुरावे आहेत. एवढंच, नाही तर तिला खात्री होती की दिवाळीला सर्वांच्या घरी पाठवल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये मी माझ्या मासिक पाळीचं रक्त मिसळायचे…’

पुढे कंगना म्हणाली, ‘ते दिवस देखील मजेदार होते… सिनेमा पार्श्वभूमी, शिक्षण, मार्गदर्शन, एजन्सी, गट किंवा मित्र / बॉयफ्रेंड नसतानाही, मी अव्वल होती… म्हणून ते सर्व एकत्रितपणे एकाच उत्तरावर आले की मी काळी जादू करते…’, असं देखील कंगना म्हणाली होत्या.

सांगायचं झालं तर, कंगना राणौत स्टारर ‘राज़: द मिस्ट्री कंटीन्यूज’ सिनेमातील कोस्टार आणि एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुंमन याने दावा केला होता की, कंगना यांनी अभिनेत्याला स्वतःच्या मासिक पाळीचं रक्त प्यायला दिलं होतं. यावर एका मुलाखतीत कंगना म्हणालेली, जेव्हा लोक मला नावं ठेवतात आणि माझ्या मासिक पाळीबद्दल बोलतात तेव्हा मला त्रास होत नाही – पण त्याला वाईट म्हणू नका. कारण मासिक पाळीच्या रक्तात वाईट असं काहीच नसतं.’ कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत.

दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.