‘बेचारा आमिर खान…’, कंगना रनौत हिने का साधला मिस्टर परफेक्शनिस्टवर निशाणा ?

कायम बॉलिवूडच्या खान अभिनेत्यांच्या विरोधात असणाऱ्या कंगनाने साधला आमिर खान याच्यावर निशाणा, आता तर अभिनेत्री थेट म्हणाली, ‘बेचारा आमिर खान...’

‘बेचारा आमिर खान...’, कंगना रनौत हिने का साधला मिस्टर परफेक्शनिस्टवर निशाणा ?
Kangana Ranaut On Aamir Khan
| Updated on: Feb 11, 2023 | 10:57 AM

Kangana Ranaut On Aamir Khan : कायम वादाचा मुकूट स्वतःच्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कायम तिच्या वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत असते. कंगनाने कायम बॉलिवूडच्या खान अभिनेत्यांना विरोध केला आहे. आता तर अभिनेत्रीने थेट बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने एक व्हिडीओ पोस्ट करत आमिर खान याला ‘बेचारा’ म्हणून उल्लेख केला आहे. सध्या आमिर खान याचा व्हिडीओ आणि कंगनाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ एका मुलाखती दरम्यानचा आहे.

नुकताच लेखिका शोभा डे यांनी आमिर खानला सर्वात परफेक्ट अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्याने दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट या तीन अभिनेत्रींची नावं घेतली. त्यावर शोभा डे, आमिर खान याला म्हणाल्या, ‘तू एका अभिनेत्रीचं नाव विसरत आहेस आणि ती आहे कंगना रनौत…’ (aamir khan movies latest)

 

 

यावर आमिर खान म्हणतो, ‘हो… कंगना देखील चांगला अभिनय करू शकते.’ सध्या आमिरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पोस्ट करत कंगनाने आमिरला सडेतोड उत्तर देत म्हणते. ‘बिचारा आमिर खान… तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी मी एकमेव अभिनेत्री आहे… ही गोष्ट आमिर याला माहिती नाही… हे दाखवण्याचा प्रयत्न अभिनेत्याने उत्तम केला.’ शिवाय शोभा डे यांची भूमिका आवडल्यामुळे कंगनाने त्यांचे आभार देखील मानले

पुढे कंगना म्हणते, ‘शोभा डे आणि माझे राजकीय विचार जुळत नाहीत. पण त्या कायम माझ्या कामाची, मेहनतीची आणि समर्पणाची प्रशंसा करताना दिसतात. तुम्हाला तुमच्या नव्या पुस्तकासाठी शुभेच्छा… मला माफ करा माझ्याकडे 4 राष्ट्रीय पुरस्कार आणि एक पद्मश्री पुरस्कार आहे. मला किती पुरस्कार मिळाले हे आठवत नाही, त्यामुळे माझ्या चाहत्याने मला आठवण करून दिली.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

यापूर्वी देखील कंगनाने अनेकदा खान अभिनेत्यांवर निशाणा साधला आहे. कंगना ट्विट करत म्हणाली, ‘चांगलं निरीक्षण… या देशाने फक्त आणि फक्त खान यांच्यावर प्रेम केलं आहे. मुस्लिम अभिनेत्रींना तर डोक्यावर घेतलंय. त्यामुळे भारतात द्वेष आणि फॅसिझमचा आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे. जगात भारतासारखा दुसरा देश नाही. असं ट्विट कंगनाने केलं होतं. ज्यामुळे अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली होती. (kangna ranaut movies)