
कॉमेडियन-अभिनेता कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांनी मुलगी अनायाराचा पहिला वाढदिवस जोशात साजरा केला आहे.

कपिलने या सेलिब्रेशनची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

कपिल आणि अनायाराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

कपिलने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आमच्या लाडोच्या पहिल्या वाढदिवशी आपल्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार’

या सेलिब्रेशन फोटोंमध्ये कपिल आणि गिन्नी यांनी अनायाराचा पहिला वाढदिवस, असे लिहिलेले टी-शर्ट परिधान केले आहेत.

अनायराने गुलाबी फ्रॉक आणि टियारा परिधान केला असून, यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.