
बॉलिवूडमध्ये अनेक असे सेलिब्रिटी आहेत चित्रपटांपेक्षाही जास्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. अशीच एक बॉलिवूडची जोडी आहे जी फार चर्चेत असते. कधी त्यांच्या धर्मामुळे तर, कधी त्यांच्या मुलांची नावांवरून. एवढंच नाही ही बॉलिवूड अभिनेत्री ज्या अभिनेत्यांच्या पहिल्या लग्नात त्याला शुभेच्छा द्यायला गेली होती. त्याच अभिनेत्या सोबत काही वर्षांनी लग्नगाठ बांधली.
अभिनेत्री हिंदू असून तिने मुस्लिम अभिनेत्यासोबत लग्न केलं
तथापी ही अभिनेत्री हिंदू असून तिने मुस्लिम अभिनेत्यासोबत लग्न केलं तेव्हाही बरीच चर्चा झाली होती. तसेच अभिनेत्री अभिनेत्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.ही बॉलिवूड जोडी म्हणजे करीना आणि सैफ अली खान. सैफने दोनदा लग्न केले आहे हे सर्वज्ञात आहे. त्याचे पहिले लग्न त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी असलेली अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाले होते. ते प्रेमविवाह होते. दोन्ही कुटुंबे त्यांच्या लग्नाच्या विरोधात होती, परंतु अखेर त्यांनी लग्न केले. विशेष म्हणजे, सैफच्या पहिल्या लग्नात करीना देखील उपस्थित होती.
नवऱ्याच्या पहिल्या लग्नात उपस्थित होती अभिनेत्री
सैफ आणि करिश्मा कपूर त्यावेळी चांगले मित्र होते आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. म्हणूनच जेव्हा सैफचे लग्न झाले तेव्हा करिश्मा आणि करिना देखील लग्नात उपस्थित होत्या. तेव्हा करिनाने सैफचे अभिनंदन केले आणि म्हटले होते, “लग्नाच्या शुभेच्छा, सैफ काका!”त्यावर सैफने उत्तर दिले होते, “धन्यवाद बेटा.”
वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केलं
13 वर्षांच्या लग्नानंतर 2004 मध्ये सैफ आणि अमृता वेगळे झाले हे जोडपे वेगळे झाले. सैफ आणि अमृताला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सैफने स्विस मॉडेल ‘रोजा कॅटालानो’ सोबत 3 वर्षे डेट केले होते. परंतु हे नातेही फार काळ टिकले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले. 2007 मध्ये ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर सैफची भेट करीना कपूरशी झाली. 5 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 5 वर्षांपूर्वी 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केले.