पुन्हा एकदा आई झाल्यानंतर करीनाने शेअर केला पहिला फोटो, पाहा कॅप्शनमध्ये काय लिहिलंय…

| Updated on: Mar 01, 2021 | 3:27 PM

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) काही दिवसांपूर्वीच दुसर्‍या मुलाला जन्म दिला आहे.

पुन्हा एकदा आई झाल्यानंतर करीनाने शेअर केला पहिला फोटो, पाहा कॅप्शनमध्ये काय लिहिलंय...
Follow us on

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) काही दिवसांपूर्वीच दुसर्‍या मुलाला जन्म दिला आहे. करीना कपूरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आणि तेथीच तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. आई झाल्यानंतरचा पहिलाच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Kareena Kapoor shared the first post-delivery photo on social)

हा फोटो शेअर करताना करीनाने लिहिले की, चाहत्यांना तिने मिस केले आणि पुढे हॅलो देखील तिने लिहिले आहे. यापूर्वी 2016मध्ये जेव्हा करीना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता. दरम्यानच्या काळात तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता.

सैफची बहीण सबा अली खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सबाने सैफचा एक जुना फोटो शेअर केला होता. यात त्याच्यासोबत लहान इब्राहीमही दिसत होता. ‘हा एक छोटासा इशारा आहे, माझे चॅम्प’, असे कॅप्शन या फोटोसाबत लिहले होते. त्यामुळे करीनाला पुन्हा मुलगाच होणार, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती.

करीना ही बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री अशी होती जिने गरोदरपणाच्या शेवटपर्यंत काम केले आहे. अनेकदा करीना इव्हेंट्सला हजर राहायची. तर कधी पत्रकारांशी ती संवाद साधायची.
प्रेग्नंसीच्या काळात करीनाने घरात बसून न राहता करीना मैत्रीणींसोबत आऊटिंगही केले होते.  करीना मैत्रिणी मलायका आणि अमृता अरोरासोबत Tip & Toe Nail Club या स्पाबाहेर दिसल्या होत्या.

संबंधित बातम्या : 

Video : श्रीदेवीच्या ‘नैनों में सपना’ गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

सनी लिओनीने फोटो शेअर करत विचारले ‘माझ्याशी लग्न कराल का?, चाहता म्हणाला…

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीच्या भावासोबत संस्कृती बालगुडेचा फोटो, चर्चा तर होणारच!

(Kareena Kapoor shared the first post-delivery photo on social)