AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर सत्य बाहेर आलंच… करिश्मा कपूरचं ते गुपित या प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं उघड; बॉलिवूडमध्ये…

शिल्पा शिरोडकरनं 'गोपी किशन' चित्रपटाच्या सेटवरील करिश्मा कपूरच्या स्वभावाचं एक गुपित उघड केलं आहे. व्हॅनिटी व्हॅन नसताना मेकअप रूमची अडचण होती, त्यावेळी करिश्मा कपूरने सुनील शेट्टी आणि शिल्पासाठी मोठी रूम सोडण्यास विरोध केला. उलट, तिने तिच्या रूममध्ये शिल्पाला सोबत घेतले.

अखेर सत्य बाहेर आलंच... करिश्मा कपूरचं ते गुपित या प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं उघड; बॉलिवूडमध्ये...
Karisma KapoorImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 01, 2026 | 11:54 PM
Share

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने गोपी किशन सिनेमाच्या सेटवरचा एक किस्सा सांगितला आहे. इंडियाज बेस्ट डान्सर सीजन 5 मध्ये शिल्पा शिरोडकर आली होती. यावेळी तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. आज ज्या प्रमाणे व्हॅनिटी व्हॅन आहेत, तेव्हा त्या नसायच्या. त्यावेळी कोणत्या अडचणी यायच्या याची माहिती देतानाच अभिनेत्री करिश्मा कपूरच्या स्वभावाचं गुपितही तिने उघड केलं.

व्हॅनिटी व्हॅन नसल्याने कलाकरांना प्रोडक्शनकडून देण्यात आलेल्या मेकअप रुममध्येच तयार व्हावं लागायचं. या शोमध्ये शिल्पा शिरोडकरने एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, गोपी किशनची शुटिंग भल्ला बंगल्यात होती. तिथे फक्त दोन मेकअप रुम होते. त्यामुळे संपूर्ण युनिटला त्यावरच काम भागवावं लागायचं. त्यावेळी माझा आणि सुनील शेट्टीचा सीन होता. त्यामुळे दोघांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी दुसऱ्या दिवशी करिश्मा कपूर शुटिंगला येणार असल्याचं कळालं. माहिती मिळताच प्रोडक्शन टीम टेन्शनमध्ये आली. कारण मेकअप रुम दोनच होत्या आणि कलाकार तीन होते.

त्यावेळी प्रोडक्शन टीम माझ्याकडे आली आणि त्यांनी मला सर्व परिस्थिती समजावून सांगितली. मी म्हटलं काही अडचण नाही. मी आणि सुनील शेट्टी एकच मेकअप रुम शेअर करू. आम्हाला फक्त तयार व्हायचं होतं. कपडे बदलायचे होते. त्यामुळे मोठी आणि चांगली रुम करिश्माला देण्याचा आम्ही निर्णय घेतला. कारण ती पहिल्यांदाच सेटवर येत होती, असं शिल्पा म्हणाली.

सेटवर येताच…

दुसऱ्या दिवशी करिश्मा सेटवर आली. तिने संपूर्ण युनिटशी चर्चा केली. वातावरण समजून घेतलं. काही वेळा नंतर तिला व्यवस्थेची माहिती मिळाली. तिने लगेच विचारलं, फक्त दोनच रुम आहे? मग सुनील शेट्टी कुठे तयार होणार आहे? त्यावेळी तिला तू येत असल्यामुळे सुनील शेट्टी आणि मी एक रुम शेअर करणार आहोत. तुझ्यासाठी सेपरेट रुम ठेवला आहे, अशी माहिती दिली. त्यावर करिश्माने आक्षेप घेतला. तसेच मला तिच्यासोबत तिचा मेकअप रुम शेअर करायला सांगितलं. त्यानंतर मी आणि करिश्मा दोघीही तिच्याच रुममध्ये तयार झालो. आणि दुसरी खोली सुनील शेट्टीला देण्यात आली, असं शिल्पा म्हणाली.

तशी नाहीये ती…

अनेकदा लोक एखाद्या कलाकाराबाबत काहीही बोलतात. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो. लोक म्हणतात करिश्मा कपूर नखरे करते. पण मी तिच्यासोबत काम करताना तिचा स्वभाव असा पाहिला नाही. ती कधी कुणाशी असं वागलं नाही. ती नेहमी समजूतदारपणे वागायची, असंही तिने स्पष्ट केलं.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे