AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू रणवीर सिंह असशील पण इतक्या बेपर्वाईने..; हायकोर्टाने अभिनेत्याला फटकारलं, नेमकं काय आहे प्रकरण?

'कांतारा: चाप्टर 1' या चित्रपटात दाखवलेल्या चावुंडी देवीची नक्कल केल्याप्रकरणी अभिनेता रणवीर सिंहला कर्नाटक उच्च न्यायालयाने चांगलंच फटकारलं आहे. सेलिब्रिटी हे कोणत्याही कायद्यापेक्षा मोठे नाहीत, असं न्यायालयाने म्हटलंय.

तू रणवीर सिंह असशील पण इतक्या बेपर्वाईने..; हायकोर्टाने अभिनेत्याला फटकारलं, नेमकं काय आहे प्रकरण?
Ranveer Singh and Rishab Shetty Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 24, 2026 | 3:20 PM
Share

गोवा सरकारद्वारे आयोजित 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेता रणवीर सिंहने ‘कांतारा : चाप्टर 1’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा अपमान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी रणवीरविरोधात खटला दाखल करण्यात आला असून त्याची सुनावणी नुकतीच पार पडली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने रणवीरला चांगलंच फटकारलं आहे. एक अभिनेता म्हणून तू अनेकांवर तुझा प्रभाव पाडतोस, त्यामुळे तू जबाबदारीनेच वागलं पाहिजेस, अशा शब्दांत कोर्टाने रणवीरला सुनावलं आहे. ‘इफ्फी’च्या मंचावर रणवीरने चावुंडी देवीचा उल्लेख ‘भूत’ म्हणून केला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाली आणि या ट्रोलिंगनंतर रणवीरने जाहीर माफीसुद्धा मागितली होती.

न्यायालयाने रणवीरला फटकारलं

सुनावणीदरम्यान न्यायाधीश म्हणाले, “ऋषभ शेट्टीने साकारलेल्या चावुंडी देवीची नक्कल केल्याने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील. तुम्ही तुमच्या विधानांमध्ये जबाबदार असलं पाहिजे. तुम्ही अजिबात कुठलाही विचार न करता बोलू शकत नाही. तुम्ही रणवीर सिंह असाल किंवा इतर कोणीही.. त्यामागे तुमचा हेतू काय होता, त्याचा आम्ही तपास करू. तुम्ही प्रसिद्ध अभिनेता असल्याने अनेक लोकांवर तुमचा प्रभाव असतो. जेव्हा तुम्ही स्टार असता तेव्हा तुम्ही जबाबदारीने वागलं पाहिजे. तुम्ही एखाद्याची नक्कल करू शकता किंवा इतर काहीही करू शकता, पण तुम्हाला कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार नाही. तुम्ही माफी मागितल्याने तुमचे शब्द मागे घेतले जातील का? मी विसरेन, तुम्ही विसराल पण इंटरनेट कधीही विसरत नाही.”

“जेव्हा कलाकार मंचावर जातो, तेव्हा हे सर्व करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही काळजीपूर्वक वागलं पाहिजे. त्या भागातील लोकांच्या धार्मिक भावनांचा तुम्ही आदर केला पाहिजे. तुम्ही एका देवतेबद्दल बोलत आहात, एका देवतेची नक्कल करत आहात. चित्रपट का बनवला गेला, याचं स्पष्टीकरण आहे. पण स्टेजवर उभं राहून तुम्ही ते इतकं हलक्यात घेऊ शकत नाही. तुम्ही बेपर्वाईने वागला आहात आणि तुम्ही जे केलं ते करण्याचा तुम्हाला अधिकार नाही”, अशा शब्दांत न्यायालयाने रणवीरला सुनावलं आहे. यावेळी रणवीरच्या बाजूने त्याचे वकील सातत्याने दिलगिरी व्यक्त करत होते. अखेर कर्नाटक उच्च न्यायालयाने रणवीर सिंहला याप्रकरणात अंतरिम दिलासा दिला आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 2 मार्च 2026 रोजी आदेश लागू होतील.

रणवीरची जाहीर माफी

‘कांतारा या चित्रपटातील ऋषभच्या अभूतपूर्व परफॉर्मन्सला अधोरेखित करण्याचा माझा हेतू होता. ऋषभने तो ठराविक सीन ज्या जबरदस्त पद्धतीने सादर केला, त्यासाठी किती मेहनत करावी लागते हे मला माहित आहे. त्यासाठी मी त्याचं खूप कौतुक करतो. आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि विश्वासाचं मी नेहमीच मनापासून आदर करतो. माझ्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो’, अशा शब्दांत रणवीरने दिलगिरी व्यक्त केली होती.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...