हृतिक रोशनच्या बहिणीला डेट करतोय कार्तिक आर्यन? चर्चांवर अखेर सोडलं मौन

कार्तिक आर्यनच्या अफेअरची जोरदार चर्चा; उत्तर देत सगळंच केलं स्पष्ट

हृतिक रोशनच्या बहिणीला डेट करतोय कार्तिक आर्यन? चर्चांवर अखेर सोडलं मौन
Kartik Aaryan and Pashmina Roshan
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 09, 2022 | 3:35 PM

मुंबई- अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. आता कार्तिकचं नाव अभिनेता हृतिक रोशनची बहीण पश्मिना रोशन हिच्याशी जोडलं जात आहे. या चर्चांवर खुद्द कार्तिकनेच प्रतिक्रिया दिल्याचं कळतंय. कार्तिक आर्यनच्या एका चाहत्याने ट्विटरवर असा दावा केला आहे. कार्तिकने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर उत्तर दिल्याचं या चाहत्याने म्हटलंय. याचा स्क्रीनशॉटसुद्धा संबंधित चाहत्याने ट्विटरवर शेअर केला आहे.

कार्तिकने सोडलं मौन?

एका फॅनपेजवरून कार्तिकला पश्मिनासोबतच्या त्याच्या अफेअरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना कार्तिकने लिहिलं, ‘नाही’. म्हणजेच त्याने स्पष्ट शब्दांत अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

कार्तिक आणि अभिनेत्री सारा अली खान यांचं अफेअरसुद्धा इंडस्ट्रीत खूप चर्चेत होतं. या दोघांनी ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यापूर्वी ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये साराने कार्तिकला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या.

कोण आहे पश्मिना रोशन?

पश्मिना ही अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण आहे. संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांची ती मुलगी आहे. पश्मिनाच्या बॉलिवूड पदार्पणाचीही जोरदार चर्चा आहे.

मात्र कार्तिक आणि साराचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. या दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला. सध्या कार्तिक त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. कार्तिकच्या ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं. आता तो फ्रेडी या चित्रपटात एका डेंटिस्टची भूमिका साकारणार आहे.