KBC 18 : अमिताभ बच्चन यांची दिवाळी कशी असायची? रणबीर कपूरच्या प्रश्नावर बिग बींनी सांगितला भन्नाट किस्सा
कौन बनेगा करोडपति या शोच्या दिवाळी स्पेशल एपिसोडसाठी रामायण चित्रपटाच्या संपूर्ण कास्टने हजेरी लावली. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवि दुबे सोबत अमिताभ बच्चन हे या शोमध्ये गेम खेळताना दिसले. त्याचा एक स्पेशल प्रोमो व्हिडीओ समोर आलाय.

‘रामायण’ चित्रपट लवकरच देशभरासह आणि जगभरात रिलीज होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या चित्रपटाची कास्ट प्रमोशनमध्ये व्यस्त असून, यातले कलाकार नुकतेच अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती 18’ या शोमध्ये आले होते. दिवाळी स्पेशल असलेला हा एपिसोड लवकच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवि दुबे हे तिघेही अमिताभ बच्चन यांच्ययासोबत शोमध्ये मस्ती करताना दिसणार आहेत. शोच्या मेकर्सनी या खास एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे.
केबीसीमध्ये रामायणच्या टीमची हजेरी
या प्रोमोमध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवि दुबे , या तिघांनीही अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारल्या . ‘रामायण: राइज ऑफ अ लीजेंड’ हा चित्रपट प्रमोट करण्यासाठी तिघेही KBC 18 च्या सेटवर पोहोचले. हा संपूर्ण एपिसोड दिवाळीच्या खास रंगात रंगलेला, सजलेला दिसणार आहे. या शोमध्ये आलेल्या रणबीरने अमिताभ बच्चन यांना, त्याच्या लहानपणीची, दिवाळीशी निगडीत आठवण विचारली. तुम्हाला लहानपणीची दिवाळी आठवते ? असं रणबीरने बिग बींना विचारलं.
अमिताभ यांनी सांगितला मजेदार किस्सा
तो प्रश्न ऐकून अमिताभ बच्चन यांनी लहानपणीचा मजेदार किस्सा ऐकवला. बिग बी म्हणाले – “ दिवाळीची फक्त एकच गोष्ट आठवते, ती म्हणजे शेजाऱ्यांच्या घरी जर मोठा बॉम्ब फुटला, तर आपला बॉम्ब त्यापेक्षा जास्त मोठ्या आवाजात फुटला पाहिजे !” बिग बींचं हे बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वांनाच हसू फुटलं. या प्रोमोमध्ये साई पल्लवी आणि रणबीर कपूर यांच्या प्रतिक्रिया देखील पाहण्यासारख्या आहेत.
इथे पहा व्हिडीओ
View this post on Instagram
तब्बल 4000 कोटींचं बजेट असलेल्या ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर हा प्रभु श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री साई पल्लवी ही सीतामाईंची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. रावणच्या भूमिकेत साऊथचा सुपरस्टार ‘रॉकी भाई’ अर्थात यश दिसणार आहे. नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दोन भागांत हा पिक्चर रिलीज होणारक आहे.
‘रामायण: पार्ट 1’ हा चित्रपट 5 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीसोबतच हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे. DNEG चे नमित मल्होत्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
