अभिनेत्रीने सांगितला तिच्या विक्रीचा धक्कादायक अनुभव; रुमवर जाताच जे घडलं ते..

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीने कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. एका कास्टिंग डायरेक्टरने तिला निर्मात्याला विकण्याचा प्रयत्न केला होता. त्याबदल्यात त्याला लाख रुपये दिले होते. नंतर जे घडलं ते..

अभिनेत्रीने सांगितला तिच्या विक्रीचा धक्कादायक अनुभव; रुमवर जाताच जे घडलं ते..
खुशी मुखर्जी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 14, 2025 | 2:26 PM

वेब सीरिज आणि रिॲलिटी शोजमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री खुशी मुखर्जी सध्या तिच्या फॅशनमुळे तुफान चर्चेत असते. सार्वजनिक ठिकाणी खुशीला बोल्ड आणि अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांमध्ये पाहिलं गेलं. त्यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकासुद्धा केली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुशीने तिच्या आयुष्यातील सर्वांत धक्कादायक किस्सा सांगितला आहे. एका कास्टिंग डायरेक्टरने मला निर्मात्याला विकण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप तिने केला.

कास्टिंग काऊचचा अनुभव सांगताना खुशी म्हणाली, “मी हैदराबादला कामाच्या शोधात गेली होती. तिथे एका कास्टिंग डायरेक्टरने मला एका निर्मात्याला विकण्याचा प्रयत्न केला. तुझी साइनिंग होईल, असं आश्वासन त्याने मला दिलं होतं. नंतर त्याने निर्मात्यासोबत माझी मिटींग घडवून आणली आणि मागून त्याला एक लाख रुपये दिले. नंतर निर्मात्याने मला जे म्हटलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. तुला माझ्यासोबत बेड शेअर करावा लागेल, असं तो म्हणाला. मला या सर्व गोष्टींबद्दल काहीच कल्पना नसल्याचं, मी त्याला सांगितलं. सुदैवाने तो निर्माता चांगला होता आणि त्याने मला जाऊ दिलं. मुंबईला परत येण्याची माझी तिकिट काढून दिली आणि त्याने मला सुरक्षित घरी पाठवलं. या इंडस्ट्रीत मी खूप काही सहन केलंय.”

खुशीला अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोल केलं गेलंय. याविषयीने तिने प्रतिक्रिया दिली. “मी अभिनेत्रीसोबतच एक फॅशन इन्फ्लुएन्सर आहे. मला जसे कपडे घालायचे असतील, तसे मी घालेन. मी पंजाबी सूटसुद्धा परिधान करते आणि जीन्स पण घालते. रेग्युलर जीन्स प्रत्येकजण घालतो, पण त्याला वेगळ्या पद्धतीने घालणं म्हणजे फॅशन असतं. एका सर्वसामान्य जीन्सला मी वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला होता”, असं तिने सांगितलं.

खुशीने तिच्या करिअरच्या सुरुवातीला बऱ्याच बी-ग्रेड चित्रपटांमध्ये आणि सीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यावरून अनेकादा तिला टीकेचा सामना करावा लागला. याबद्दलही तिने मौन सोडलं आहे. नाईलाजामुळे नाही तर स्वत:च्या पसंतीने बोल्ड सीरिजमध्ये काम केल्याचं तिने स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर पैसे भरभक्कम मिळत होते, म्हणूनही ऑफर स्वीकारल्याची कबुली तिने दिली. “मी एक कलाकार आहे. मी बी ग्रेड, सी ग्रेड, डी ग्रेड किंवा झेड ग्रेड पाहणार नाही. जेव्हा माझी काम करायची इच्छा असेल, तेव्हा मी करेन. मी ए लिस्टर चित्रपटांमध्येही काम केलंय. मी मालिकांमध्येही झळकली आहे. मला चांगल्या पैशांची ऑफर मिळाली होती, म्हणून मी स्क्रिप्ट न वाचताच होकार दिला होता”, असं खुशी पुढे म्हणाली.