Kiara Advani च्या हातावर ‘ही’ सेलेब्रेटी आर्टिस्ट काढणार मेहंदी ; खास फोटो व्हायरल

अंबानी कुटुंबाच्या महिलांच्या हातावर ज्या सेलेब्रेटी आर्टिस्टने मेंहदी काढली, तिच महिला किआरा हिच्या हातावर काढणार लग्नाची मेहंदी; एक खास फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण

Kiara Advani च्या हातावर ही सेलेब्रेटी आर्टिस्ट काढणार मेहंदी ; खास फोटो व्हायरल
Kiara Advani हिने फक्त सिद्धार्थ मल्होत्रालाच 'या' सेलिब्रिटींना देखील केलय डेट
| Updated on: Feb 03, 2023 | 3:21 PM

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनंतर अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. येणाऱ्या काही दिवसांत दोघे लग्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या तारखेपासून दोघंच्या लग्नाच्या ठिकाणापर्यंत सर्व माहिती समोर आली आहे. किआरा – सिद्धार्थ राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याचं कळत आहे. आता किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. सध्या चाहत्यांना देखील किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण किआरा – सिद्धार्थ यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

रिपोर्टनुसार, सेलेब्रेटी आर्टिस्ट वीना नागदा, किआरा अडवाणीच्या हातावर लग्नाची मेहंदी काढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वीना यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्या राजस्थानसाठी रवाना होताना दिसत आहेत. महत्त्वाचं म्हणजे किआरा – सिद्धार्थ याचं लग्न देखील राजस्थानमध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सेलेब्रेटी मेहंदी आर्टिस्ट वीना नागदा याचे फोटो समोर आल्यानंतर किआरा – सिद्धार्थ विवाहबंधनात अडकणार असल्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. वीना नागदा यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर कॅप्शनमध्ये ‘राजस्थान कॉलिंग’ असं लिहिलं आहे. वीना नागदा विमानतळावर उभ्या असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. सध्या त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

वीना नागदा यांनी याआधी अंबानी कुटुंबाची लेक ईशा अंबानी आणि सून श्लोका मेहता यांच्या हातावर देखील मेहंदी काढली होती. वीना आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना मेहंदी काढली आहे. वीना यांच्या सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींसोबत फोटो आहेत. वीना यांनी याआधी देखील एका जाहिरातीमध्ये किआरा हिच्यासोबत काम केलं आहे. आता किआरा हिच्या आयुष्यातील खास दिवशी वीना अभिनेत्रीच्या हातावर मेहंदी काढणार आहेत. ७ फेब्रुवारी रोजी दोघे लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी यांनी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. शिवाय दोघांनी टीव्ही कमर्शियलसाठी देखील एकत्र काम केलं आहे. आता अभिनेता “योद्धा” सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तर किआरा ‘सत्यप्रेम की कथा’ सिनेमात अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत दिसणार आहे.