किरण मानेंना मिळाला नवा चित्रपट; चित्रीकरण सुरू ?

किरण माने यांना अचानक मालिकेतून बाहेर काढल्याचा आरोप त्यांनी निर्मात्यावर केला होता.

किरण मानेंना मिळाला नवा चित्रपट; चित्रीकरण सुरू ?
अभिनेते किरण माने
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 2:36 PM

मुंबई – स्टार प्रवाहवरील (star pravah) मुलगी झाली हो या मालिकेतील वाद एका टोकाला गेल्याचे आपण पाहिले. त्यानंतर किरण माने (kiran mane) यांचं होणार काय असा अनेकांना प्रश्न पडला होता. परंतु किरण माने यांना एक नवा चित्रपट मिळाला असून त्यांनी त्यांच्या कामाला सुरूवात केल्याचे नुकतेच फेसबुक पोस्टमध्ये (facebook post) जाहीर केले आहे. नव्या प्रोजेक्टची ही माहिती थोडक्यात लिहितोय असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं तसेच यावर पुन्हा सविस्तर लिहीणार असल्याचं सुध्दा त्यांनी पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

किरण माने यांना अचानक मालिकेतून बाहेर काढल्याचा आरोप त्यांनी निर्मात्यावर केला होता. तसेच कोणतीही पुर्वसुचना देण्यात आली नसल्याचे त्यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये म्हणटले होते. त्यांच्या पोस्ट विरोधात असणा-या एका व्यक्तीने त्यांना आता घरी बसला अशी पोस्ट केल्यामुळे त्यांनी मी सद्या काय करतोय याबाबत फेसबुकला पोस्ट लिहीली आहे. रावरंभा या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्याची पोस्ट त्यांनी केली असून त्यांच्यासोबत इतर मोठे कलाकार सुध्दा असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हणटले आहे.

या खेळाडूचे वयाच्या ३ वर्षापासून क्रिकेटशी नाते; कपिल शर्माच्या शोमध्ये उघडले रहस्य

‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती? जाणून घ्या…

बॉलिवूडची ही अभिनेत्री पडली होती सामान्य मुलाच्या प्रेमात, गुपचूप लग्न केल्याची चर्चा