AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाह, आता मुंबई पोलीस..; इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; किरण रावची संतप्त प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?

Imran Khan: आंदोलनात सहभागी झाल्याने अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांनी थेट भारत सोडून जाण्यासाठी नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आता आमिर खानची पूर्व पत्नी किरण रावने प्रतिक्रिया दिली आहे.

वाह, आता मुंबई पोलीस..; इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; किरण रावची संतप्त प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?
Kiran Rao and Imran KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 16, 2026 | 8:34 AM
Share

Imran Khan: अभिनेता आमिर खानचा भाचा आणि ‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता इम्रान खान सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. मुंबई पोलिसांच्या परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाने (FRRO) इम्रानला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. या प्रकरणावर आता आमिरची पूर्व पत्नी आणि चित्रपट निर्माती किरण राव हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ‘वाह! आता मुंबई पोलीस?’ अशा शब्दांत तिने आश्चर्य व्यक्त केलं आहे. तिची ही प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस बजावल्याची बातमी समोर आल्यानंतर किरण रावने इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रतिक्रिया दिली. ‘वाह, आता मुंबई पोलीस?’ असं म्हणत तिने आश्चर्य व्यक्त केलं. इम्रानने आयुष्यातील मोठा काळ भारतात घालवला आहे. इथंच त्याचं शिक्षण, काम आणि वैयक्तिक आयुष्य घडलं, हा मुद्दा किरणने अधोरेखित केला. तिच्या या भूमिकेमुळे मनोरंजन विश्वात या प्रकरणावर चर्चा सुरू झाली आहे. अभिनेता आणि हृतिक रोशनची जोडीदार सबा आझाद हिनेदेखील या नोटीसवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘वय 43 वर्षे, त्यापैकी 40 वर्षे भारतात घालवली. इथेच शिक्षण घेतलं, काम केलं, यश मिळवलं, अपयश पचवलं, प्रेम मिळवलं आणि संघर्षही केला’, अशा आशयाची पोस्ट किरण रावने इम्रानसाठी लिहिली आहे.

किरण रावची पोस्ट-

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 10 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात झालेल्या आंदोलनापासून झाली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनात इम्रान सहभागी झाला होता. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबाबत (SIR) कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर हे आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान इम्रान, त्याची प्रेयसी लेखा वॉशिंग्टन आणि इतर आंदोलकांना मुंबई पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर इम्रानच्या सहभागाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही यासंदर्भात तक्रार केली होती.

इम्रान खानकडे अमेरिकेचं नागरिकत्व असून त्याच्याकडे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्ड आहे. मात्र, OCI कार्ड म्हणजे भारतीय नागरिकत्व नव्हे. आंदोलनातील सहभागामुळे इमिग्रेशन आणि फॉरेनर्स अॅक्ट, 2025 मधील तरतुदींचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत FRRO ने त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, इम्रानच्या वकिलांनी या नोटीसला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे. OCI कार्डधारकांना आंदोलनात सहभागी होण्यास कायद्याने स्पष्ट मनाई आहे का, तसंच या कारवाईचा कायदेशीर आधार काय आहे, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!