‘किचन कल्लाकार’च्या मंचावर राजकीय धुरळा; किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ, रुपाली ठोंबरे बनवणार पदार्थ

| Updated on: Apr 05, 2022 | 3:28 PM

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांच्यासोबत राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ आणि रुपाली ठोंबरे यांनी किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावली. यावेळी महाराजांसाठी चविष्ट पदार्थ बनवणं काही सोपं नव्हतं कारण त्यांना जेवण बनवतानाच एक मोठं आव्हान दिलं होतं.

1 / 5
झी मराठी वाहिनीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. या कार्यक्रमात प्रेक्षकांना कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहायला मिळते. या आठवड्यात कलाकार नाही तर काही सुप्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्व किचन कल्लाकारच्या सेटवर पाहायला मिळतील.

2 / 5
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांच्यासोबत राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ आणि रुपाली ठोंबरे यांनी किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावली. यावेळी महाराजांसाठी चविष्ट पदार्थ बनवणं काही सोपं नव्हतं कारण त्यांना जेवण बनवतानाच एक मोठं आव्हान दिलं होतं.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांच्यासोबत राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ आणि रुपाली ठोंबरे यांनी किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावली. यावेळी महाराजांसाठी चविष्ट पदार्थ बनवणं काही सोपं नव्हतं कारण त्यांना जेवण बनवतानाच एक मोठं आव्हान दिलं होतं.

3 / 5
हातात किंवा कडेवर भाजीची टोपली घेऊन त्यांना पदार्थ बनवायला सांगण्यात आलं. त्यामुळे यात कोण बाजी मारणार हे पाहणं औस्त्युक्याचं ठरेल. इतकंच नव्हे तर किशोरी यांना एक खास सरप्राईजदेखील या भागात देण्यात आलं. हा एपिसोड  बुधवारी रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

4 / 5
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अत्यंत उत्तमरित्या करत आहे. पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचनमध्ये कस लागतो. आतापर्यंत अनेक कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावली. काहींनी त्यांच्या खासगी आयुष्यातील मजेशीर किस्सेसुद्धा सांगितले.

5 / 5
खवय्ये म्हटल्यावर एक चेहरा हमखास डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे अभिनेता प्रशांत दामले यांचा. किचन कल्लाकारमध्ये प्रशांत दामले हे परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. कुठले कलाकार पाककलेचे शिवधनुष्य पेलवू शकले याचा अंतिम निर्णय हे प्रशांत दामले घेतात.