Donald Trump : जेन्सन हुआंग यांच्या राजीनाम्यानंतर Nvidia मध्ये CEO पदासाठी रस्सीखेच ; ट्रम्प यांनी सुचवले ‘टिम कुक’ यांचे नाव
Nvidia चा CEO जेन्सेंग हुआंग याचे एलिस हुआंग हीच्याशी असलेले प्रेमप्रकरँ बाहेर आल्यानंतर त्याला Nvidia च्या CEO पदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या Nvidia CEO पदासाठी योग्य व्यक्तीच्या शोधात आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे Executive Chairman टिम कुक यांचे नाव सुचवले आहे.

जगातील आघाडीच्या चीप निर्मीती कंपन्यांपैकी एक असलेल्या Nvidia मध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. कंपनीचे CEO जेन्सन हुआंग यांचे प्रेमप्रकरण बाहेर आल्यानंतर त्यांना त्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या पुढील CEO ची चर्चा सुरू झाली आहे. या CEO पदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या —- चे नाव घेतले जात आहे. अशातच डोन्लाड ट्रम्प यांनी Nvidia च्या पुढील पदासाठी थेट अॅपलचे चेअरमन टिम कुक यांचे नाव सुचवले आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे टेकविश्वात मोठी उलथापालथ व्हायला सुरूवात झाली आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपलं मत मांडलं
ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत जेन्सन हुआंग यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. हुआंग यांनी कंपनीसाठी उत्तम काम केल्याचं सांगत त्यांच्या जागी टिम कुक हेच योग्य व्यक्ती असल्याचं त्यांनी म्हटलं. ‘एका दिग्ग्जाची जागा दुसरा दिग्गज घेईल’ अशा आशयाची टिप्पणीही ट्रम्प यांनी केली.
टिम कुक यांनी यापूर्वी 15 वर्ष अॅपलचे CEO म्हणून काम पाहिलं आहे. सप्टेंबर 2026 मध्ये त्यांनी CEO पदं सोडलं. त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाचे Executive Chairman म्हणून ते काम पाहत आहेत. आपल्या कारकिर्दित त्यांनी अॅपलचा विस्तार आणि कंपनीचा जागतिक विस्तार आणि व्यवसाय वाढवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
Nvidia ची जबाबदारी सध्या कोणाकडे
जेन्सन हुआंग यांनी CEO पदासोबतच कंपनीच्या संचालक मंडळातूनही पायउतार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या जागी कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकारी कोलेट क्रेस यांची अंतरिम CEOC म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या कंपनी कायमस्वरूपी CEO च्या शोधात आहे. या निवडीत कंपनीतील अनुभवी अधिकारी आणि बाहेरील उमेदवारांचा विचार केला जाणार आहे.
टिम कुक यांची निवड होणार का?
ट्रम्प यांनी टिम कुक यांच नाव सुचवलं असलं, तरी Nvidia ने त्यांची CEO पदासाठी निवड केल्याची कोणतेही घोषणा केलेली नाही. कंपनीच्या उत्तराधिकारी निवडण्याच्या प्रक्रियेत ट्र्म्प यांचा औपचारिक अधिकारीही नाही.त्यामुळे सध्या ही केवळ ट्रम्प यांनी व्यक्त केलेली पसंती आहे.प्रत्यक्षात Nvidia ची धुरा कोणाकडे जाणार, याकडे आता टेकविश्वाचं लक्ष लागलं आहे.
