केएल राहुलने अथिया शेट्टीला केलं किस; लग्नानंतरचा व्हिडीओ व्हायरल

या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अथिया आणि राहुलचा एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नवविवाहित दाम्पत्याचा रोमँटिक अंदाज पहायला मिळत आहे.

केएल राहुलने अथिया शेट्टीला केलं किस; लग्नानंतरचा व्हिडीओ व्हायरल
KL Rahul and Athiya Shetty
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 01, 2023 | 3:15 PM

मुंबई: अभिनेते सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी नुकतीच विवाहबंधनात अडकली. अथिया आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी 23 जानेवारी रोजी खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अथिया आणि राहुलचा एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नवविवाहित दाम्पत्याचा रोमँटिक अंदाज पहायला मिळत आहे.

केएल राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मोशन टाइप या व्हिडीओत दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं पहायला मिळत आहे. या व्हिडीओत दोघं एकमेकांना किस करतानाही दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर येताच केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या रोमँटिक अंदाजाची चर्चा होत आहे. चाहत्यांनीही ही जोडी खूप आवडत आहे.

23 जानेवारी रोजी सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये अथिया आणि राहुल लग्नबंधनात अडकले. या लग्नसोहळ्याला मोजके पाहुणे उपस्थित होते. अथिया आणि राहुल सध्या इन्स्टाग्रामवर या लग्नसोहळ्याचे आणि त्यापूर्वी पार पडलेल्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आयपीएल सिझननंतर केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या रिसेप्शनचं आयोजन करणार असल्याची माहिती सुनील शेट्टी यांनी दिली.

एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून राहुल आणि अथिया यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांमधील मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. अथियाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट लिहित राहुलने त्याचं प्रेम जाहीर केलं होतं.

Follow Us