Salman Khan : ‘कॉफी विद करण 9’ मध्ये सलमान खानने हातात जे घड्याळ घातलंय त्यात सर्वसामान्य माणसाचं घर येईल, किंमत ऐकून थक्क व्हाल
Salman Khan : अभिनेते सलमान खान याने नुकताच 'कॉफी विथ करण 9' शोमध्ये हजेरी लावलेली, तेथे अभिनेत्याने करण याच्यासोबत गप्पा मारल्या, पण सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त भाईजानच्या घड्याळाकडे होतं... यामध्ये सर्वसामान्य माणसाचं घराचं स्वप्न पूर्ण होईल... घड्याळाची किंमत जाणून तुम्हीही थक्क व्हाल...

Salman Khan : अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहते सलमान खान याच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. सांगायचं झालं तर, सलमान खान फक्त त्याच्या सिनेमांमुळे नाही तर, आलिशान आणि खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. दरम्यान, भाईजान नुकतात बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण 9’ शोमध्ये दिसला. शोचे काही व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण सलमान खान याच्या महागड्या घडाळ्यावर सर्वांच्या नजरा येऊन थांबल्या आहेत.
‘कॉफी विथ करण 9’ मध्ये पोहोचलेल्या सलमान खान याने निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स घातली होती. पण चर्चा फक्त सलमान खान याच्या घड्याळाची चर्चा रंगली आहे. रिपोर्टमध्ये, सलमान खान याच्या मनगटावर Jacob & Co कंपनीची घड्याळ दिसला. घड्याळाची किंमत जवळपास 41 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
सांगायचं झालं तर, इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, Koffee with Karan 9 च्या एका भागात सलमान खानने ‘जेकब अँड को.’ कंपनीच घड्याळ घातल होत. या घड्याळाची किंमत सुमारे 41 लाख रुपये असल्याचे सांगितलं जात आहे, मात्र त्याच्या विशिष्ट मॉडेलचं नाव नमूद केलेलं नाही.
सलमान खान याच्या या महागड्या घड्याळाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. पण भाईजानच्या या घड्याळ्याच्या किंमती एका सर्वसामान्या माणसाचं स्वप्न पूर्ण होईल. 41 लाख रुपयांमध्ये एक घर तर नक्कीच येईल. 41 लाख रुपये एका सर्वसामान्य व्यक्तीसाठी फार मोठी रक्कम आहे.
Jacob & Co काय आहे?
जेकब अँड कंपनी (Jacob & Co.) हा खरं तर एक अमेरिकन ब्रँड आहे. ही कंपनी लक्झरी घड्याळं आणि दागिने तयार करते. त्यांची घड्याळं जगभरात लोकप्रिय आहेत आणि ती प्रतिष्ठेचे प्रतीक मानली जातात.
‘कॉफी विथ करण’ आणि सेलिब्रिटी
‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करण जोहर सेलिब्रिटींना त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल प्रश्न विचारतो… शिवाय अन्य सेलिब्रिटींबद्दल देखील चर्चा केली जाते. आता सलमान याने देखील त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहे..
इंडस्ट्रीमध्ये सलमान खान याचं करियर
गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. आजही चाहत्यांमध्ये अभिनेत्याची क्रेझ कायम आहे. गेल्या तीन दशकांपासून अभिनेता बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. सलमान खान याने अनेक नव्या सेलिब्रिटींना देखील इंडस्ट्रीमध्ये संधी दिली आहे. सलमान खान कायम कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
