AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda : पतीला मारण्याचा प्रयत्न..सुनीता आहुजाच्या वक्तव्यानंतर कोमल राणीचे गंभीर आरोप, म्हणाली – अशी स्त्री

अभिनेता गोविंदाशी कथित अफेअर आणि सुनीता अहुजांनी केलेली विधान, आरोपांच्या पार्श्वभूमीवर कोमल रानी स्वर्णकरने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी लिहून सुनीताबद्दल अनेक दावे केले आहेत. ती सतत कट रचते, गोविंदाला मानसिक त्रास देते आणि तिला त्याला बरबाद करायचं आहे, असा आरोप कोमलने आपल्या स्टोरीमध्ये केला आहे.

Govinda : पतीला मारण्याचा प्रयत्न..सुनीता आहुजाच्या वक्तव्यानंतर कोमल राणीचे गंभीर आरोप, म्हणाली - अशी स्त्री
| Updated on: Sep 26, 2026 | 4:09 PM
Share

ब़ॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची सहकलाकार, भिनेत्री कोमल रानी स्वर्णकार यांच्या कथित नात्याच्या चर्चांना आता नवं वळण मिळालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांच्या जवळिकीची सोशल मीडियावर चर्चा सुरू असतानाच,आता अभिनेत्री कोमल राणी हिने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत सुनीता आहुजा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी कोमल रानी स्वर्णकार ही गोविंदासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. त्यावेळी दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या भेटीनंतर त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आलं. त्यानंतर सुनीता आहुजा यांनी अनेक विधानं केली. त्या दक्षिणेश्वर काली मंदिरात गेल्या होत्या. त्यांनी आपल्या मंदिरभेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी, “माझं घर कोणत्याही कारणाशिवाय उद्ध्वस्त होत आहे,” असं म्हटलं होतं. सुनीता यांच्या या वक्तव्यानंतर आणि आरोपांनंतर आता कोमल राणी हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

जे घर आधीपासूनच तुटलंय

यानंतर कोमन राणीने सुनीता यांच्यावर पलटार करत लिहीलं की, ” जे घर आधीपासूनच तुटलंय, ते आणखी कोणीच तोडू शकत नाही”. एवढंच नव्हे तर तिने असाही दावा केला आहे की सुनीता आपल्या पतीला मारण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप तिने केलाय. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

कोमल राणीने एक मोठी पोस्ट लिहीत इन्स्टा स्टोरीवर ती शेअर केली आहे. “ जी स्त्री अनेक वर्षांपासून स्वतःच्या पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशा स्त्रीचे शाप कोणालाही लागत नाहीत. जे घर आधीपासूनच तुटलेलं आहे, ते दुसरं कोणीही तोडू शकत नाही”. “आपल्या देशातील लोक इतके मूर्ख नाहीत की, कोणीतरी ‘कावळा तुमचा कान घेऊन गेला’ असं म्हटलं म्हणून ते कावळ्याच्या मागे धावत सुटतील.” असं लिहीत तिने टोला लगावला आहे.

एवढंच नव्हे तर कोमल राणीने सुनीता आहुजा यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या, “ मला समजत नाही की एखादी महिला अशा कोणत्या वेदनेतून जात्य़े, जिथे ती सावरण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ती आपली वेदना सर्वांसमोर दाखवण्यात व्यस्त आहे. हे खरंच दुःख आहे की विचारपूर्वक रचलेला एखादा कट आहे? ” असा सवालही कोमलने आपल्या पोस्टमधून विचारला आहे.

सुनीता आहुजा गोविंदांना मानसिक त्रास देत असल्याचा दावा

कोमल राणी हिने आपल्या पोस्टमध्ये गोविंदांच्या वैवाहिक आयुष्याबाबतही गंभीर दावे केले आहेत. “ एखाद्या पुरुषाला सतत मानसिक त्रास देणं, त्याला काम करण्यापासून रोखणं, त्याला घरी बसून उद्ध्वस्त होण्यास भाग पाडणं, त्याला पूर्णपणे एकटं पाडणं आणि त्याला मृत्यूच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणं—मला वाटत नाही की कोणतीही चांगली आणि समर्पित पत्नी आपल्या पतीसोबत इतकं वाईट वर्तन करू शकते,” असं म्हणत तिने सुनीता अहुजावर पलटवार केला आहे.

” अशा महिला मानसिदृष्ट्या आजारी असतात की त्या फक्त खूप हुशार, चलाख असतात. बंद दरवाज्याआड त्या जे करू शकल्या नाहीत ते सर्वांसमोर येऊन लोकांचा सहानुभूती मळवून करू शकतात, हे त्यांना चांगलंच माहीत असतं ? तुमचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी माझ्या नावाचा वापर करणं बंद करा. देव प्रत्येक चांगल्या पुरुषाला अशा हुशार महिलांपासून वाचवो.” असंही तिने या पोस्टमध्ये लिहीलं आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?