Govinda : एकमेकांच्या मिठीत, चेहऱ्यावर हसू अन्…कोमल राणीनं शेअर केले गोविंदासोबतचे रोमँटिक फोटो; संतापली राखी सावंत

Komal Rani Swarnkar And Govinda : कोमल राणीनं गोविंदासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. त्यावर राखी सावंतनं कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Nov 12, 2026 | 10:24 PM
1 / 5
गोविंदा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. एकीकडे, त्याची पत्नी सुनीतासोबतच्या मतभेदांच्या बातम्या सतत येत असतात. तर दुसरीकडे, तो सात वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. गोविंदा 'रूपा' या चित्रपटात दिसणार असून, यात कोमल राणी स्वर्णकर मुख्य नायिका आहे.

2 / 5

गोविंदा आणि कोमल राणी अनेकदा एकत्र दिसतात. आता, कोमलनं गोविंदासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गोविंदा कोमलसोबत रोमान्स करताना दिसत आहे. हे फोटो 'रूपा' चित्रपटातील आहेत. कोमलनं या पोस्टला 'रूपा'मधील एक सुंदर झलक' असं कॅप्शन दिलं आहे.

3 / 5

फोटोंमध्ये कोमलनं जांभळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. गोविंदानं पांढरा शर्ट, ब्लेझर आणि काळी पँट घातलेला दिसत आहे. फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून पोज देताना दिसत आहेत.

4 / 5

कोमलच्या या फोटोंवर राखी सावंतनंही कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. राखी सावंतनं रागात असणारे इमोजी शेअर केले आहेत.

5 / 5

दरम्यान, गोविंदाचे कोमलसोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. गोविंदाची पत्नी, सुनीतानेही गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले होते. पण, गोविंदानं कोमलसोबतच्या अफेअरच्या अफवा फेटाळून लावल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us