Kranti Redkar : लग्नानंतर अफेअर करतात आणि पकडले जातात, तसं माझं…क्रांती रेडकरनं सांगितला किस्सा

Kranti Redkar : क्रांती रेडकरनं सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत आला आहे.

| Updated on: Nov 07, 2026 | 6:31 PM
1 / 5
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करते. असाच एक व्हिडिओ अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केला असून तिचा हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करते. असाच एक व्हिडिओ अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केला असून तिचा हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

2 / 5

क्रांती रेडकर म्हणाली की, 'लग्नानंतर जे अफेअर करतात आणि पकडले जातात, तसा एक फील मला छबिलमुळे आला. मी बाहेरून आल्यावर ती माझी बॅग चेक करते, काही खायला मिळेल म्हणून. तर तिला ही चिट्ठी मिळाली.'

3 / 5

'त्यादिवशी मी एका स्टारबक्समध्ये गेलेले. तिथे एका मुलीने मला ती चिट्ठी दिली. तर छबिलला वाटलं, मला दुसरं बाळ आहे. छबिल, मला अशा चिठ्ठ्या देते ना, तर तिला वाटलं, अशा चिठ्ठ्या मला दुसरं कोणीतरी देतं. माझ्यावर चीटिंगचा आरोप.'

4 / 5

'मी तिला म्हटलं, कॉफी शॉपमध्ये गेलेलो तेव्हा तिथल्या एका मुलीने मला ही चिट्ठी दिली. मग छबिलनं विचारपूस करायला सुरुवात केली. तिला मग मी समजावलं.'

5 / 5

'नंतर गोदो आली, आणि तिनं समजूतदार मुलीसारखं छबिलला समजावलं.' असं क्रांती शेवटी म्हणाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us