Kumar Sanu : रियलिटी शो च्या स्टेजवर कुमार सानू यांनी जे केलं त्याची सगळीकडे चर्चा, सरळ हातातलं सोन्याचं घड्याळ काढलं अन्..

Kumar Sanu : कुमार सानू जज म्हणून या कार्यक्रमाला बसले होते. स्टेजवरील उदयोन्मुख गायकाचा आवाज त्यांना इतका आवडला की ते स्वत:ला रोखू शकले नाहीत.

Kumar Sanu : रियलिटी शो च्या स्टेजवर कुमार सानू यांनी जे केलं त्याची सगळीकडे चर्चा, सरळ हातातलं सोन्याचं घड्याळ काढलं अन्..
Kumar Sanu
| Updated on: Nov 08, 2026 | 3:58 PM

नव्वदच्या दशकात प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी आपल्या गोड गळ्याने प्रेक्षकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवलं. आजही त्यांनी गायलेली गाणी आणि त्यांची लोकप्रियता तितकीच अबाधित आहे. सध्या कुमार सानू प्रेक्षकांना रियलिटी शो मधून भेटतात. एखाद्या रियलिटी शो चे जज किंवा प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलावलं जातं. असचं ते सध्या ‘सा रे गा मा पा 2026’ शो चे जज आहेत. ‘हिंदुस्तान का संगीतस्थान’ या ‘सा रे गा मा पा’ च्या शो मध्ये सहजदीप या गायकाचा परफॉर्मन्स कुमार सानू यांना प्रचंड आवडला. त्यानंतर कुमार सानू यांनी जे केलं, त्याची सगळीकडे चर्चा होत आहे. सहजदीपचं गाण कुमार सानू यांना इतकं आवडलं की, ते जागेवरुन उठले व त्या सहजदीपच्या गात असलेल्या स्टेजवर गेले.

ते सहजदीपला म्हणाले की, ‘मला काही बोलायचं नाहीय, मला तुला काहीतरी द्यायचं आहे’ त्यांनी हातातलं सोन्याचं घड्याळ काढलं व बक्षीस म्हणून सहजदीपला दिलं. सहजदीपच्या गायकीच कौतुक आणि धनोत्रयोदशीच्या निमित्ताने हे घड्याळ त्याला गिफ्ट करत असल्याचं कुमार सानू यांनी जाहीर केलं. “आज धनतेरस आहे, सेलीब्रेशन म्हणून मी हे तुला देतोय. तू उत्तम गाणं गायलास, तू हे मिळवलं आहेस” असं कुमार सानू सहजदीपला म्हणाले.

Loading...

दोघांच्या आवाजाने वेड लावलं होतं

कुमार सानू यांनी त्यांच्या करिअरमध्ये बरीच हिंदी गाणी गायली आहे. आजही अनेक घरांमध्ये कुमार सानू यांनी गायलेली रोमँटिक गाणी ऐकू येतात. त्यांच्या आवाजाची जादूच तशी होती. 90 च दशक कुमार सानू आणि उदित नारायण या दोघांनी गाजवलं. त्यावेळच्या तरुणाईला या दोघांच्या आवाजाने वेड लावलं होतं. कुमार सानू आता प्रेक्षकांना रिअलिटी शो चं मधून भेटत असतात. एकतर या कार्यक्रमांमध्ये जज म्हणून येतात किंवा एखाद्या एपिसोडला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलावलं जातं.

आवाजाची जादू कायम

आजही कुमार सानू यांचं विश्लेषण प्रत्येक गायकासाठी महत्वाचं मानलं जात. त्यांना आदर्श म्हणून संगीत क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात करणारे अनेक गायक आहेत. उदयोन्मुख तसच 80-90 मधल्या पिढीवर आजही कुमार सानू यांच्या आवाजाची जादू कायम आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us