Monalisa Marriage : कुंभमेळा गर्ल मोनालिसाने केलं लग्न, घरच्यांच्या विरोधात जाऊन थेट…झाली महाराष्ट्राची सून!

कुंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा ही आता नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले आहे. पोलिसांच्या संरक्षणात तिचा विवाह पार पडला आहे.

Monalisa Marriage : कुंभमेळा गर्ल मोनालिसाने केलं लग्न, घरच्यांच्या विरोधात जाऊन थेट...झाली महाराष्ट्राची सून!
kumbh mela girl monalisa marriage
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 11, 2026 | 8:20 PM

Monalisa Marriage : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा सध्या एक अभिनेत्री आहे. ती कुंभमेळ्यात अगदी साध्या वेशात माळ विकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. घारे डोळे आणि तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर ती सगळीकडे खूपच चर्चेत आली होती. तिचा एक चित्रपटही येणार असून त्याचा ट्रेल फेब्रुवारी 2026 मध्ये रिलीज करण्यात आला आहे. दरम्यान, आता हीच मोनालिसा आता पुन्हा एकदा नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आहे. केरळच्या तिरुअनंतपूरम येथील Arumanoor या मंदिरात जाऊन तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. तिच्या नवऱ्याचे नाव फरमान खान असे आहे.

घरातून निघून आली आणि केले लग्न

मिळालेल्या माहितीनुसार मोनालिसा आणि फरमान खान हे गेल्या दीड वर्षांपासून प्रेमात होते. फरमान खान हा महाराष्ट्राचा आहे. तर मोनालिसा मध्य प्रदेशमधील इंदोर शहरातील आहे. या लग्नाला मोनालिसाच्या कुटुंबीयांकडून विरोध होता. माझ्या घरचे या लग्नाला होकार देणार नाहीत, हे लक्षात येताच मोनालिसाने थेट केरळ गाठलं आणि आपला प्रियकर फरमान खान याच्याशी लग्न केलं आहे. लग्न करण्यासाठी मोनालिसाने तिरुअंनतपूरम येथे जाऊन पोलिसांना संरक्षण मागितले होते.

पोलिसांच्या संरक्षणात केले लग्न

तिरुअनंतपुरम येथे पोहोचल्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यावेळी माझे वडील विजयसिंह भोसले माझ्या इच्छेविरोधात लग्न करून देत आहेत, असे सांगितले होते. त्यानंतर तिने पोलीस संरक्षणात आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केले आहे. सुरुवातीला मोनालिसा ही अल्पवयीन असल्याचा दावा केला जात होता. परंतु पोलिसांच्या तपासात तिला 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, असे समोर आले आहे. मोनालिसाचे वडील तिला परत घेऊन जाण्यासाठी केरळमध्ये गेले होते. परंतु मोनालिसाने त्याला विरोध केला.

ही खरी केरला स्टोरी

दरम्यान, या लग्नासाठी केरळचे शिक्षणमंत्री व्ही शिवनकुट्टी, सीपीएम पक्षाचे राज्य सचिव एम व्ही गोविंदन, खासदार ए ए रहीम सहभागी झाले होते. हा विवाह म्हणजे सौहार्दाचे एक उदाहरण आहे. ही खरी ‘केरला स्टोरी’ आहे, असे ए ए रहीम म्हणाले.

Follow Us