Viral Girl Monalisa: कुंभमेळ्यात मोनालिसासोबत गैरवर्तन, व्हिडिओ पाहिल्यानंतर होईल संताप
Mahakumbh 2025 Viral Girl Monalisa: सोशल मीडियावर कायम काही न काही व्हायरल होत असतं. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल गर्ल मोनालिसा चर्चेत आहे. सध्या सर्वत्र मोनालिसा हिची चर्चा रंगली आहे. कुंभमेळ्यात मोनालिसासोबत गैरवर्तन झालं आहे.

Mahakumbh 2025 Viral Girl Monalisa: प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये IIT वाले बाबा आहेत. तर कोणी कांटेवाले बाबा. पण सर्वाचं लक्ष वेधलं ते म्हणजे हार विकणाऱ्या एका मुलीने. महाकुंभ मेळ्यातील ज्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत, त्या मुलीचं नाव मोनालिसा येथील आहे.
मोनालिसा हिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं आहे. हार विकणारी साधी मुलगी आता सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. पण प्रसिद्धीझोतात आल्यामुळे मोनालिसाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. सध्या सर्वत्र व्हायरल गर्ल मोनालिसा हिची चर्चा रंगली आहे.
मोनालिसासोबत गैरवर्तन
मोनालिसा हिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी अनेक जण तिच्या भोवती गर्दी करत आहेत. ज्यामुळे मोनालिसाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तिच्या भोवती लोकांची गर्दी जमते. तेव्हा मोनालिसा हिचं कुटुंब तिच्या बचावासाठी पुढे आलं.
View this post on Instagram
मोनालिसाच्या कुटुंबियांनी सांगितल्यानुसार, गर्दीच्या ठिकाणी कुटुंबिय मोनालिसा हिचा चेहरा कपड्याने लपवतात. या व्हिडिओमध्ये दिसणारे लोक YouTubers आणि vlogger आहेत, ज्यांना मोनालिसाची मुलाखत घ्यायची आहे. पण व्हिडीओ समोर आल्यानंतर YouTubers आणि vlogger यांनी टीकेचा सामना करावा लागत आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तेथे लोकं भक्तीसाठी जातात. पण आता ते मनोरंजनाचं स्थळ झालं आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मोनालिसाला त्रास देणं बंद करा…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मोनालिसाच्या सुरक्षेत वाढ करावी लागले.’ अन्य एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘कोणाच्या बहीण, लेकीसोबत असं करु नये…’ असं देखील चाहत्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.
कोण आहे मोनालिसा?
महाकुंभ मेळा 2025 सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये मोनालिसा ही एक साधी मुलगी देखील आहे जी तुफान चर्चेत आहे आणि संपूर्ण सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओ आणि फोटोंची चर्चा रंगली आहे. तिचं पूर्ण नाव मोनालिसा भोसले असं आहे. कुंभमेळ्यात कुटुंबासोबत हार विकण्यासाठी आलेली मोनालिसा एका रात्रींत स्टार झाली आहे . सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.