Janhavi Kapoor : तिला कॉन्सर्टला नेऊ नकोस! जान्हवी कपूरचा वीर पहारियाला डेटिंगबाबत सल्ला; ताराचं नाव न घेता मारला टोमणा? नेटकरी मात्र संतापले !

'कॉफी विथ करण 9'मध्ये आलेल्या जान्हवी कपूरने वीर पहारियाला डेटिंगबद्दल सल्ला दिला. मात्र तिचं हे बोलणं म्हणजे तारा सुतारियावर साधलेला निशाणा हता असं बोललं जात आहे. तिच्या विधानावरून युजर्स चांगलेच भडकले आहेत.

Janhavi Kapoor : तिला कॉन्सर्टला नेऊ नकोस! जान्हवी कपूरचा वीर पहारियाला डेटिंगबाबत सल्ला; ताराचं नाव न घेता मारला टोमणा? नेटकरी मात्र संतापले !
| Updated on: Oct 29, 2026 | 3:10 PM

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नुकतीच वरूण धवन आणि अर्जुन कपूरसोबत, करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 9’ (Koffee With Karan) या चॅट शोमध्ये आली होती. या दरम्यान तिने विविध विषयांवर मतं मांडली. गप्पा मारल्या. करणशी संवाद साधताना तिने पेड्डी चित्रपटावरून झालं ट्रोलिंग आणि इतर अनेक विषयांवर तिचं मत मांडलं. या शोमध्ये रॅपिड फायर राऊंडदरम्यान करणने जान्हवीला एक प्रश्न विचारला, तेव्हा तिने वीर पहारियाला सल्ला दिला. मात्र तेव्हाच ती असं काही बोलली की ते ऐकून सगळेच थक्क झाले. त्याचं कारण म्हणजे जान्हवीने अप्रत्यक्षरित्या वीर पहारिया आणि तारा सुतारियाच्या ब्रेकअपवर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे.

करणने जान्हवीला काय विचारलं ?

Loading...

रॅपिड फायरदरम्यान करण जोहरने जान्हवीला विचारलं की तू वीर पहारियाला डेटिंगबद्दल काय सल्ला ( ॲडव्हाइस ) देशील ? त्यावर जान्हवीने लगेच उत्तर दिलं, ‘कधीही तिला (गर्लफ्रेंड) कॉन्सर्टला घेऊन जाऊ नकोस ‘. वीर पहारिया हा अभिनेता असून, तो जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड, शिखरचा भाऊ आहे. गेल्या वर्षी वीर पहारिया आणि तारा सुतारिया हे दोघे एपी ढिल्लनच्या कॉन्सर्टसाठी गेले होते.त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या.

 

जान्हवीने सल्ला देत त्यांच्या याच ब्रेकअपवरून निशाणा साधल्याचं बोललं जात आहे, मात्र अनेक युजर्सना जान्हवीचं हे बोलणं बिलकूल आवडलं नाहीये. तिच्या या विधानावर अनेक कमेंट्स, प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींना हे उत्तर मजेशीर, चुलबुली टाइप्स वाटलं, मात्र मजेत क होईना दुसऱ्या महिलेबद्दल बोलून, तिला मध्ये आणायची काय गरज होती ? असं अनेकांचं मत आहे.

युजर्सची जान्हवीवर टीकेची झोड

जान्हवीच्या य़ा कमेंटनंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. “ दुसऱ्या महिलेला कमी लेखण्याची गरजच काय? हे खूपच लाजिरवाणं आहे” अशी कमेंट एका युजरने केली. तर “ केवळ एक हॅम्पर जिंकण्यासाठी ती इतक्या खालच्या पातळीवर घसरली” असं म्हणत आणखी एकाने जान्हवीवर टीकास्त्र सोडलं. तिसऱ्या युजरने देखील जान्हवीच्या या टिप्पणीबद्दल नाराजी व्यक्त केली. “दुसऱ्या महिलेवर टोमणा मारणं टाळता आलं असतं ” , असं त्याने म्हटलं.

खरंतर, डिसेंबर 2025 मध्ये मुंबईत झालेल्या एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमध्ये तारा सुतारिया त्याच्यासोबत मंचावर परफॉर्म करताना दिसली होती. यावेळी समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एपी ढिल्लों ताराला मिठी मारताना आणि तिच्या गालावर किस करताना दिसला. यानंतर सोशल मीडियावर वीर पहाडियाच्या प्रतिक्रियेवरूनही विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. काही यूजर्सनी दावा केला होता की, व्हिडिओमध्ये वीर अस्वस्थ दिसत होता. मात्र, नंतर वीरने स्पष्ट केले की, त्याच्या रिॲक्शनची क्लिप ही कॉन्सर्टमधील दुसऱ्याच एका क्षणाची होती. तर दुसरीकडे, तारा सुतारियानेही तिच्याबद्दल कथितपणे पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्या आणि पैसे देऊन राबवल्या जाणाऱ्या पीआर मोहिमांबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती आगामी चित्रपटांमुळेही चर्चेत आहे. येत्या काळात ती टायगर श्रॉफ आणि लक्ष्य यांच्यासोबत ‘लग जा गले’ या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us