lalit Prabhakar Prahaar Movie Flop : ललित प्रभाकरचा ‘प्रहार’ प्लॉप होण्याच्या मार्गावर, 2 आठवड्यात फक्त 3 कोटींची कमाई, तर आदिनाथ कोठारेचा सिनेमाची बक्कळ…..
प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्वल निकम या सिनेमात कसाबच्या भूमिकेसाठी ललितची निवड करण्यात आली. त्याने केलेल्या कामाने त्याचे सर्वत्र कौतुक झाले. त्याचा अभिनय सर्वांना फारच आवडला, पण त्याच्या सिनेमाला प्रेक्षकांनी म्हणावी तसा प्रतिसाद दिलेला दिसत नाही. म्हणून बॉक्स ऑफिसवर प्रहार प्लॉप होण्याच्या मार्गावर आहे.

मराठी अभिनेता ललित प्रभाकर हा मराठी सिनेमांतला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. त्याचं सिनेमातील काम, मालिकांमधील कामाने प्रत्येकाला भूरळ पाडली आहे. प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्वल निकम या सिनेमात कसाबच्या भूमिकेसाठी ललितची निवड करण्यात आली. त्याने केलेल्या कामाने त्याचे सर्वत्र कौतुक झाले. त्याचा अभिनय सर्वांना फारच आवडला, पण त्याच्या सिनेमाला प्रेक्षकांनी म्हणावी तसा प्रतिसाद दिलेला दिसत नाही. म्हणून बॉक्स ऑफिसवर प्रहार प्लॉप होण्याच्या मार्गावर आहे.
पहिल्या आठवड्यात कसाबसा जम बसवलेल्या या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या वीकेंडला मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कामागिरीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.’प्रहार’ ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या वीकेंडला भारतात सुमारे 3.10 कोटींची कमाई केली. दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने अंदाजे 1.25 कोटी रूपये, तर रविवारीही जवळपास 1.25 कोटी रूपये कमावले. पहिल्या वीकेंडच्या तुलनेत दुसऱ्या वीकेंडनमधील कमाईत सुमारे 65 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
दहा दिवसांत किती कमाई?
चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत साधारण 8.50 कोटी रूपयांची कमाई केली होती. पहिल्या आठवड्याच्या अखेरीस त्याची भारतातील कमाई सुमारे 16 कोटी रूपये झाली. दुसऱ्या वीकेंडमधील कमाई जोडल्यावर दहा दिवसांचा एकूण गल्ला अंदाजे 19.10 कोटी रूपयांवर पोहोचला. मात्र ही बॉक्स ऑफिसची कमाई अंदाजित आकडेवारी आहे. वेगवेगळ्या अहवालांमध्ये कमाईचे आकडे वेगळे असू शकतात.
‘प्रहार’ चं दिग्दर्शन अविनाश अरूण यांनी केलं आहे. हा चित्रपट ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या कायदेशीर कारकिर्दिवर संबंधित घटनांवर आधारित आहे.चित्रपटात राजकुमार राव उज्ज्वल निकमांच्या भूमिकेत असून, जयदीप अहलावत, वामिका गब्बी,आशिष विद्यार्थी आणि इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख अहवालांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आठवड्याच्या दिवसांत आणि दुसऱ्या वीकेंडमध्ये कमाई वाढवण्यात चित्रपटाला यश आलं नाही. सध्याच्या कमाईचा वेग पाहता ‘प्रहार’ चा चित्रपटगृहांतील प्रवास निराशाजनक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र चित्रपटाची अंतिम कमाई किती होते, हे पुढील दिवसांतील कामगिरीवर अवलंबून असेल.
आदिनाथ कोठारेचा सिनेमा
बॉक्स ऑफिसवर आदिनाथ कोठारे आणि ललित प्रभाकर यांच्या चित्रपटांमध्ये जोरदार टक्कर झाली आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकिंगनुसार, आदिनाथ कोठारेच्या ‘नयी नवेली’ चित्रपटाने ललित प्रभाकरच्या ‘प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी’ चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवरील या थेट शर्यतीत आदिनाथ कोठारेचा चित्रपट ललित प्रभाकरच्या चित्रपटापेक्षा जवळपास 6.12 कोटी रुपयांनी पुढे आहे.