पाकिस्तानची ती सुंदर अभिनेत्री जिला राजकपूर करणार होते सून, परंतू भारतात येण्यास दिला होता नकार..
पाकिस्तानची त्या काळातील अत्यंत सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगिता यांना राजकपूर यांनी त्यांची सून म्हणून स्वीकारले होते. त्यांना चित्रपटाची ऑफर देखील देण्यात आली होती.

राज कपूर यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा ग्रेट शोमॅन म्हटले जाते. राज कपूर यांनी अभिनेता ते चित्रपट निर्माता म्हणून नितांत सुंदर चित्रपट दिले. त्यांच्या कपूर घराण्याने हिंदी चित्रपटसृष्टीत दबदबा निर्माण केला तो आजतागायत कायम आहे. तुम्हाला त्यांचा साल १९८२ चा प्रेमरोग चित्रपट आठवत असेल. या चित्रपटात त्यांचा मुलगा ऋषी कपूर यांनी काम केले होते. या चित्रपटात जरी पद्मिनी कोल्हापूरे यांनी ऋषी कपूर सोबत काम केले असले. मात्र, पद्मिनी कोल्हापूरे याच्या आधी या चित्रपटात राज कपूर एका पाकिस्तानी अभिनेत्रीला घेणार होते. मात्र, हे शक्य झाले नाही, नेमके काय झाले ?
खरंच १९८२ चा प्रेम रोग हा चित्रपट संगीतमय मेजवाणी होता. या चित्रपटात काळाच्या पुढची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटाच्या कथेचे खूपच कौतूक झाले होते. पद्मिनी कोल्हापूरे यांनी या चित्रपटात सहजसुंदर अभिनय केला. मात्र, या चित्रपटात आधी पाकिस्तानची त्या काळची सुंदर अभिनेत्री संगीता यांना घेण्यात येणार होते. पाकिस्तानी अभिनेत्री संगीता ऊर्फ परवीन रिझवी या पाकिस्तानच्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. परवीन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की राज कपूर यांनी प्रेमरोग चित्रपटासाठी कास्ट केले होते. राज कपूर त्यांना सून करुन घेणार होते.
येथे पोस्ट वाचा –
View this post on Instagram
संगीता ऊर्फ परवीन यांनी एका मुलाखतीत सांगितले की राज कपूर यांनी तिला प्रेम रोग चित्रपटासाठी संपर्क केला होता. संगिता अत्यंत सुंदर आणि प्रतिभावान होत्या. चित्रपटात त्यांना घेतल्यामुळे इंडस्ट्रीला नवा चेहरा मिळेल असे राज कपूर यांना वाटले होते.राज कपूर यांनी आपल्या सून होण्याची ऑफरही दिल्याचे त्यांनी सांगितले. राज कपूर यांची खरंतर संगीताने त्यांचा मुलगा ऋषी कपूरशी लग्न करावे अशी इच्छा होती. मात्र आपण ही ऑफर नम्रपणे नाकारल्याचे संगिता यांनी सांगितले. आपल्या आपल्या स्वत:च्या देशात इतकी प्रसिद्धी असताना आपण दुसऱ्या देशात का जायचे असे त्यांना वाटले. संगिता यांनी नकार दिल्यानंतर हा रोल पद्मिनी कोल्हापुरे यांना मिळाला. हा चित्रपट म्युझिकल हिट्स ठरला.
