AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे फक्त 45 पैशांमध्ये 10 लाख रुपयांचा विमा कसा देते, त्यात नुकसान का होत नाही? समजून घ्या सगळं गणित

IRCTC वरून रेल्वे तिकीट बुक करताना अवघ्या 45 पैशांत प्रवास विम्याचा पर्याय मिळतो. इतक्या कमी रकमेत लाखोंचे विमा संरक्षण कसे मिळते आणि रेल्वे किंवा विमा कंपनीला यातून आर्थिक नुकसान का होत नाही? यामागचं गणित जाणून घ्या.

रेल्वे फक्त 45 पैशांमध्ये 10 लाख रुपयांचा विमा कसा देते, त्यात नुकसान का होत नाही? समजून घ्या सगळं गणित
IRCTC travel insuranceImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 27, 2026 | 9:13 PM
Share

भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाहून तुम्हीही म्हणालं की हे कसंकाय शक्य आहे, पण होय हे खरं आहे. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना रेल्वेने केवळ ४५ पैशांमध्ये वीमा सुरक्षा दिली आहे. ही सुविधा आधी फक्त ऑनलाईन तिकिट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांपूरती मर्यादित होती. पण आता ती सर्व प्रवाशांना लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते. त्यानंतर रेल्वेने आता सरसकट प्रवाशांना ज्यांनी तिकिट काढले आहे. त्यांना हे वीमा कवच पुरविले आहे. पण प्रश्न असा आहे की केवळ ४५ पैशांमध्ये तब्बल १० लाखांचा वीमा देताना रेल्वेला नुकसान होत नाही का? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

रेल्वेकडून प्रवाशांना प्रवासाच्या संभाव्य जोखीमांच्या अनुशंगाने वीमा दिला जातो. पण हा वीमा फक्त एक रुपयांपेक्षाही कमी म्हणजे ४५ पैशांमध्ये तब्बल १० लाख रूपयांचे मजबूत सुरक्षा कवच दिले जाते. पण या वीम्याचा फायदा घेण्यासाठी तिकिट काढताना ऑनलाइन पद्धतीने पैसे पे करणं बंधनकारक असते. याशिवाय वीमा कवच केवळ त्याच तिकिटांना लागू आहे, जे तिकिट कंन्फर्म किंवा आरसी असतील. प्रवाशांचा यात्रेदरम्यान त्यांची आर्थिक सुरक्षा अबादित राखणं हा यामागचा उद्देश आहे.

दरम्यान, या वीमा योजनेला एकटं रेलवे खातं चालवत नाही. त्यासाठी खाजगी कंपन्यांसोबत करार केलेले आहेत. ही एक समूह विम्यावर चालणारी योजना आहे. महत्त्वाचे म्हणजे देशभरात प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा समावेश केल्यामुळे प्रति व्यक्ती प्रीमियमचा खर्च केवळ ४५ पैशांपर्यंत कमी होतो. हे मॉडेल विमा कंपन्यांना मोठा ग्राहकही उपलब्ध करून देतो, त्याचमुळे इतक्या कमी खर्चातही ही योजना यशस्वीपणाने चालते.

यामध्ये रेल्वे अपघात, दरोडा, गोळीबार किंवा इंतर गंभीर दुर्घटना घडल्यानंतर प्रवाशांना किंवा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत या रकमेने केली जाते. मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख तर अंशतः अपंगत्व आल्यास त्याला ७.५० लाख रुपये दिले जातात. तर गंभीर उपचारांसाठी २ लाख आणि मृतदेह नेण्यासाठी १० हजार रुपयांचा समावेश असतो. वीम्याची रक्कम मिळवण्यासाठी घटनेच्या चार महिन्याच्या आतच कंपनीकडे लेखी अर्ज करणं बंधनकारक असतं.

रेल्वेला हे वीमा संरक्षण कवच देताना नुकसान न होण्याचं एकमेव कारण आहे देशातील प्रवाशांची मोठी संख्या. मोठा प्रीमियम निधी उपलब्ध होतो. त्याच्या तुलनेमध्ये रेल्वे अपघातांना बळी पडणाऱ्या लोकांची संख्या खूपच कमी असते. त्यामुळे कंपन्यांना द्यावी लागणारी रक्कम ही गोळा केलेल्या रकमेपेक्षा लक्षणीयरित्या कमी असते.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...