
बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनी अजूनही चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. हेमा मालिनीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. हेमा मालिनी यांनी त्यांच्या कारकीर्दीत सर्व प्रकारचे चित्रपट केले आहेत. पण तुम्हाला हेमा मालिनीसारखी दिसणारी ही व्यक्ती माहिती आहेत का?

सीमा मोटवानीनं अनेक शोमध्ये काम केलं आहे, मिमिक्री आर्टिस्ट आणि कॉमेडियन म्हणून तिनं आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती, सीमा मोटवानी हेमा मालिनीसोबत अभिनेता पुनीत इस्सरच्या टीव्ही शो 'जय माता की' मध्ये देखील काम करत होती. हेमा मालिनी देवीच्या भूमिकेत असताना सीमा मोटवानीला राणीची भूमिका देण्यात आली होती.

या शोच्या सेटवर ती एकदा फिरत असताना सेटवरील लोकांना त्यावेळी हेमा मालिनी फिरत असल्याचे जाणवलं होतं. असा खुलासा खुद्द सीमा यांनी केला होता.

ती अनेक दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. तिनं 20 हून अधिक जाहिराती केल्या आहेत आणि बर्याच टीव्ही शोजमध्येही काम केले आहे, 'कभी सौतन कभी सहेली', 'कसौटी जिंदगी की', 'कहता है दिल', 'शक लका बूम बूम', 'हेन्ना तेरे नाम' या मालिकांमध्ये ती दिसली होती.

हेमा मालिनी यांची एकमेव डुप्लिकेट असल्यानं विशेषत: लाइव्ह शोसाठी त्यांची जास्त मागणी असते. प्रत्येक शोसाठी 35 ते 45 हजार इतकी फी त्या आकारतात.