LipLock | रणबीर कपूर याचा 14 वर्षानी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत लिपलॉक, चाहत्यांचा संताप, थेट सुनावले खडेबोल

रणबीर कपूर हा सध्या तूफान चर्चेत आहे. रणबीर कपूर याला थेट ईडीने समन्स पाठवलाय. रणबीर कपूर याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. रणबीर कपूर हा त्याच्या आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आहे.

LipLock | रणबीर कपूर याचा 14 वर्षानी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत लिपलॉक, चाहत्यांचा संताप, थेट सुनावले खडेबोल
| Updated on: Oct 11, 2023 | 5:33 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ॲनिमल (Animal) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये रणबीर कपूर याच्यासोबत साऊथ स्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही मुख्य भूमिकेत आहे. ॲनिमल हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित नक्कीच आहे. ॲनिमल चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना यांना एकसोबत पाहण्यास चाहते आतुर आहेत. ॲनिमल चित्रपटाबद्दल एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय.

ॲनिमल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच रणबीर कपूर याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये. रणबीर कपूर याला थेट ईडीने समन्स पाठवलाय. या प्रकरणात इतरही काही बाॅलिवूड कलाकारांना ईडीकडून समन्स पाठवलाय. महादेव गेमिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूर याच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

आता नुकताच ॲनिमल चित्रपटाचे पहिले गाणे निर्मात्यांकडून रिलीज करण्यात आलंय. या गाण्याच्या अगोदर एक पोस्टरही रिलीज केले गेले आहे. या पोस्टरमध्ये चक्क रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना हे लिपलाॅक करताना दिसत आहेत. यामुळे लोकांना धक्का बसलाय. हे पोस्टर तूफान व्हायरल होताना दिसतंय.

दुसरीकडे रश्मिका मंदाना हिचे चाहते हे संतापल्याचे दिसत आहेत. कारण या पोस्टरवर फक्त रणबीर कपूर याचेच नाव आहे. रश्मिका मंदाना ही देखील साऊथची स्टार असून तिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका देखील केल्या. मात्र, असे असूनही तिचे नाव पोस्टरवर नसल्याने चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना याचे लिपलाॅक पाहून अनेकांना थेट विजय देवरकोंडा याचीच आठवण आल्याचे देखील दिसतंय. एकाने यावर कमेंट करत लिहिले की, हे पाहून मला विजय देवरकोंडाची आठवण आली. दुसऱ्याने लिहिले की, रश्मिका तुझ्याकडून ही अपेक्षा आम्हाला नक्कीच कधी नव्हती. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे.