Madhuri Dixit | माधुरी दीक्षितच्या वाढदिवशी जाहीर करा ‘नॅशनल हॉलिडे’; सरकारकडे कोणी केली मागणी?

1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटात माधुरीने सलमान खानसोबत भूमिका साकारली होती. मोठ्या पडद्यावरील या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. याच चित्रपटासाठी माधुरीला सलमानपेक्षा जास्त मानधन मिळालं होतं.

Madhuri Dixit | माधुरी दीक्षितच्या वाढदिवशी जाहीर करा नॅशनल हॉलिडे; सरकारकडे कोणी केली मागणी?
Madhuri Dixit
Image Credit source: Instagram
| Updated on: May 15, 2023 | 8:51 AM

मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षितची वेगळी ओळख देण्याची गरज नाही. दमदार अभिनय कौशल्य, सौंदर्य आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर तिने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केलं आहे. बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ असं नाव तिला देण्यात आलं आहे. 1984 मध्ये ‘अबोध’ या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. आजवर तिने सलमान खान, शाहरुख खान, अनिल कपूर यांसारख्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. माधुरी आज (15 मे) तिचा 56 वा वाढदिवस साजरा करतेय. तिचे केवळ भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. एका व्यक्तीने माधुरीच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची सरकारकडे मागणी केली होती.

वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी

माधुरीच्या वाढदिवसाला ‘नॅशनल हॉलिडे’ जाहीर करण्याची मागणी करणारा व्यक्ती जमशेदपूरमधील एक चाहता होता. या मागणीची जोरदार चर्चा झाली होती.

माधुरीने परिधान केला होता 30 किलोंचा लेहंगा

2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’ या चित्रपटातील ‘काहे छेड छेड मोहे’ या गाण्यासाठी माधुरीने अत्यंत सुंदर लेहंदा परिधान केला होता. हा लेहंगा तब्बल 30 किलोंचा असल्याचं म्हटलं जातं. यामध्ये तिने ऐश्वर्या राय आणि शाहरुख खानसोबत भूमिका साकारली होती.

अभिनेत्री व्हायचं नव्हतं

माधुरी आज बॉलिवूडमधल्या सर्वांत मोठ्या अभिनेत्रींपैकी एक असली तरी सुरुवातीला तिला अभिनयात करिअर करायचं नव्हतं. माधुरीला शिक्षणाची फार आवड होती आणि तिला विज्ञानात विशेष रस होता. त्यामुळ पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला पॅथोलॉजिस्ट व्हायचं होतं.

सलमान खानपेक्षा जास्त मिळाली फी

1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात माधुरीने सलमान खानसोबत भूमिका साकारली होती. मोठ्या पडद्यावरील या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. याच चित्रपटासाठी माधुरीला सलमानपेक्षा जास्त मानधन मिळालं होतं.

बॉलिवूडमध्ये करिअरमध्ये शिखरावर असताना माधुरी दीक्षितने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं आणि अमेरिकेला राहायला गेली. गेली बरीच वर्षे हे दोघं मुलांसोबत अमेरिकेत राहत होते. आता काही वर्षांपूर्वीच भारतात परतल्यानंतर माधुरीने पुन्हा इंडस्ट्रीत पुनरागमन केलं. या दोघांना आरिन आणि रायन अशी दोन मुलं आहेत. माधुरीने 2003 मध्ये आरिनला आणि 2005 मध्ये रियानला जन्म दिला. जवळपास दहा वर्षांपूर्वी ती तिच्या कुटुंबीयांसोबत भारतात परतली.