Kon Honar Crorepati : ‘मी एक कोटी जिंकले..’, माधुरीला ‘करोडपती’ मिळाला? Video पाहून तुम्हीही म्हणाल…

Kon Honar Crorepati : अभिनेत्री माधुरी दीक्षित होस्ट करत असलेला शो 'कोण होणार करोडपती' सध्या तुफान चर्चेत आहे. अशात शोला पहिला करोडपती कधी मिळाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दीक्षितदरम्यान, नुकताच समोर आलेल्या प्रोमेची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Kon Honar Crorepati : मी एक कोटी जिंकले.., माधुरीला करोडपती मिळाला? Video पाहून तुम्हीही म्हणाल...
Madhuri Dixit
| Updated on: Oct 29, 2026 | 11:54 AM

Kon Honar Crorepati : अभिनेत्री माधुरी दीक्षित होस्ट करत असलेला शो ‘कोण होणार करोडपती’ सध्या सर्वत्र तुफान चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील शोचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून, नुकताच शोचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये ‘कोण होणार करोडपती’ शोला करोडपती मिळाला अशी चर्चा सुरु झाली आहे. सध्या सर्वत्र ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या प्रोमोची चर्चा रंगली आहे. व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार हॉटसीटवर बसलेल्या रत्ना म्हणते ‘मी एक कोटी जिंकले….’, तर जाणून घ्या रत्ना असं का म्हणाली.

प्रोमोमध्ये रत्ना नावाची स्पर्धत हॉटसीटवर बसली आहे आणि तिच्या समोर, बॉलिवूडची ‘धकधक गर्ल‘ माधुरी बसलेली आहे. सांगायचं झालं तर, शोमध्ये आलेल्या अनेक स्पर्धकांनी आणि सेलिब्रिटींनी माधुरीचं कौतुक केलं. पण रत्नाने जे केलं त्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. रत्ना हिने माधुरीला विचारलं, ‘माझ्यासमोर बसल्यानंतर तुम्हाला कसं वाटत आहे?’ यावर माधुरी म्हणते, ‘माझ्यासमोर एक हिरो बसलाय… असं मला वाटत आहे…’ यावर रत्नी धन्यवाद म्हणते आणि आनंद व्यक्त करत म्हणते, ‘मी एक कोटी जिंकले…’, सांगायचं झालं तर, रत्ना हिने प्रत्येक्षात कोटी रुपये जिंकले नाही. पण तिच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं. अशात रत्ना किती रुपये स्वतःसोबत घेऊन जाते. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...

 

‘कोण होणार करोडपती’चा पहिला करोडपती कोण?

रिपोर्टनुसार, ‘कोण होणार करोडपती’ शोचा पहिला करोडपती असण्याचा मान महादेव जाधव आणि त्यांच्या पत्नी अनिता जाधव यांना मिळाला आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील या दाम्पत्याने 2014 मध्ये एक कोटी रुपये जिंकले. महादेव जाधव यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते सिव्हिल इंजिनिअर आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर होते. मोठ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती, तर आर्थिक परिस्थितीची बेताची असल्यामुळे त्यांनी शोमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर पत्नीच्या सहकार्याने आणि ज्ञानाच्या जोरावर त्यांनी मोठं यश मिळवलं. अखेर मराठी मराठी टेलिव्हिजनवरील या कार्यक्रमातील पहिली करोडपती जोडी म्हणून त्यांची नोंद झाली.

आता माधुरी होस्ट करत असलेल्या शोमध्ये करोडपती कोण होतं? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माधुरी होस्ट करत असलेल्या ‘कोण होणार करोडपती’ शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि प्रश्न – उत्तरांचा खेळ खेळत स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. शोमध्या माधुरी देखील तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी स्पर्धक आणि चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. सध्या सर्वत्र ‘कोणा होणार करोडपती’ शोची चर्चा सुरु आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us