Madhuri Dixit: म्हणूनच डॉक्टर नवरा शोधला..; सोनाली बेंद्रेसमोर माधुरी दीक्षितची प्रामाणिक कबुली

Madhuri Dixit: 'कोण होणार करोडपती'च्या सेटवर माधुरी दीक्षित सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत आहे. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने माधुरीच्या लग्नाच्या विषयावरून गंमत केली. त्यावर माधुरीनेही मजेशीर अंदाजात उत्तर दिलं.

Madhuri Dixit: म्हणूनच डॉक्टर नवरा शोधला..; सोनाली बेंद्रेसमोर माधुरी दीक्षितची प्रामाणिक कबुली
Madhuri Dixit and Dr Shriram Nene
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 13, 2026 | 11:22 AM

Madhuri Dixit: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि दिलखुलास स्वभावाने चाहत्यांची मनं जिंकते. 90 च्या दशकात माधुरीच्या अभिनयावर आणि नृत्यावर चाहते अक्षरशः फिदा होते. तिच्या लग्नाची बातमी समोर आली, तेव्हा अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला होता. आता तब्बल अनेक वर्षांनंतर माधुरीने आपल्या लग्नाबद्दल केलेल्या एका मजेशीर वक्तव्याची चर्चा रंगली आहे. ‘कोण होणार करोडपती’ या मराठी रिअॅलिटी शोमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने माधुरीला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर माधुरीने दिलेल्या उत्तराने सेटवर हशा पिकला.

माधुरीने डॉक्टरशीच लग्न का केलं?

माधुरी दीक्षितने 17 ऑक्टोबर 1999 रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथं डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी माधुरी तिच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर होती. तिच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की, तिच्या लग्नाच्या बातमीने अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ‘कोण होणार करोडपती’च्या सेटवर सोनाली बेंद्रेने हाच विषय काढला. माधुरीचं लग्न झालं, तेव्हा अनेक चाहत्यांचा हार्टब्रेक झाला होता, असं सोनालीने म्हटलं. यावर माधुरीने अतिशय मिश्किल अंदाजात उत्तर दिलं.

Loading...

पहा व्हिडीओ-

माधुरी म्हणाली, “म्हणून मी अशा माणसाशी लग्न केलं, जो Heart Mend करतो!” म्हणजेच, हृदय जोडण्याचं अर्थात त्यावर उपचार करण्याऱ्या व्यक्तीशी तिने लग्न केलं, असा विनोद तिने केला. डॉ. श्रीराम नेने हे हृदयविकारांशी संबंधित शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. माधुरीचं हे उत्तर ऐकून सोनाली बेंद्रेसह उपस्थितांनाही हसू आवरलं नाही.

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर रंगल्या गप्पा

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात माधुरी दीक्षित सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहे. या कार्यक्रमाच्या ग्रँड प्रीमियरला सोनाली बेंद्रे पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. दोघींनी खेळासोबतच त्यांच्या आयुष्यातील आठवणी आणि मनोरंजनविश्वातील अनुभवांवरही गप्पा मारल्या. सोनाली आणि माधुरी यांच्यातील संवादामुळे कार्यक्रमात मनोरंजनाची रंगत वाढली. दोघींच्या या खास संवादातील काही क्षण सोशल मीडियावरही चर्चेत आले आहेत.

माधुरी आणि श्रीराम नेने यांच्या नात्याची खासियत म्हणजे दोघांची पार्श्वभूमी वेगळी असतानाही त्यांच्यात छान जुळवून आलं. माधुरीने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावलं होतं, तर श्रीराम नेने हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. श्रीराम नेने अमेरिकेत वाढले असल्यामुळे त्यांना माधुरीच्या लोकप्रियतेची सुरुवातीला फारशी कल्पना नव्हती, असं त्यांनी यापूर्वी सांगितलं आहे. लग्नानंतर माधुरी काही काळ अमेरिकेत राहिली. त्यानंतर ती पुन्हा भारतीय मनोरंजनविश्वात सक्रिय झाली. आज हे जोडपं आपल्या कौटुंबिक आयुष्यासोबत व्यावसायिक क्षेत्रातही आपापली ओळख जपत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us