Mahesh Babu: महेश बाबूचा भाऊ चौथ्यांदा करतोय लग्न; लिपलॉक व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

महेश बाबूच्या भावाच्या लग्नाची जोरदार चर्चा; लिपलॉकच्या व्हिडिओने वेधलं नेतकऱ्यांचं लक्ष

Mahesh Babu: महेश बाबूचा भाऊ चौथ्यांदा करतोय लग्न; लिपलॉक व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
Mahesh Babu: महेश बाबूचा भाऊ चौथ्यांदा करतोय लग्न; लिपलॉक व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2023 | 7:44 AM

हैदराबाद: साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा भाऊ आणि अभिनेता नरेश त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. नरेश हा महेश बाबूचा सावत्र भाऊ आहे. गेल्या काही काळापासून तो अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबतच्या अफेअरमुळे प्रकाशझोतात आहे. आता खुद्द नरेशनेच रिलेशनशिपची कबुली दिली आहे. पवित्रासोबत लवकरच लग्न करणार असल्याचंही त्याने जाहीर केलं आहे. नरेशने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो पवित्रासोबत दिसत आहे. याच व्हिडीओच्या माध्यमातून त्याने पवित्राशी लग्न करणार असल्याचं म्हटलंय.

सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. कँडल, केक आणि खिडकीबाहेर नववर्षानिमित्त आतषबाजी.. असा रोमँटिक माहौल या व्हिडीओत पहायला मिळतोय. यामध्ये नरेश आणि पवित्रा एकमेकांना केक भरवताना दिसत आहेत. यानंतर दोघं लिपलॉक करतात.

पहा व्हिडीओ-

‘नवीन वर्ष, नवी सुरुवात.. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. आमच्याकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा’, असं कॅप्शन देत नरेशने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये आधी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि त्यानंतर ‘लवकरच लग्न करणार आहोत’ असं लिहिलेलं पहायला मिळतं.

नरेश बाबू हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. बालकलाकार म्हणून त्याने करिअरची सुरुवात केली होती. मात्र नरेश नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला. आतापर्यंत त्याने तीन वेळा लग्न केलं आहे. मात्र तिन्ही वेळा त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओद्वारे त्यांनी जाहीर केलं की ते चौथ्यांदा लग्न करत आहेत. दुसरीकडे पवित्रा लोकेशचं हे दुसरं लग्न आहे. पवित्राचं पहिलं लग्न 2007 मध्ये सुचेंद्र प्रसादशी झालं होतं.