Makarand Anaspure : नानांची प्रतिमा मलीन…तनुश्री दत्ताच्या आरोपांवर काय म्हणालेले मकरंद अनासपुरे?
Makrand Anaspure : मकरंद अनासपुरे यांनी जुन्या मुलाखतीत तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांवर भाष्य केलं होतं.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता चर्चेत आली आहे. अभिनेत्रीनं नाना पाटेकर यांच्या निधनानंतर वादग्रस्त वक्तव्य केलं. अभिनेत्री इथेच थांबली नाही तर ती सोशल मीडियावर पोस्ट करत नाना पाटेकर यांच्याबद्दल अनेक वादग्रस्त विधानं करतेय. काही वर्षांपूर्वी तनुश्रीनं २०१८ च्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान गैरवर्तन आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप नाना पाटेकर यांच्यावर केलेला. यावर अभिनेते आणि नाना पाटेकर यांचे जवळचे मित्र मकरंद अनासपुरे यांनी प्रतिक्रिया दिलेली. आता मकरंद अनासपुरे यांची जुनी मुलाखत व्हायरल होतेय.
काय म्हणाले मकरंद अनासपुरे?
मकरंद अनासपुरे म्हणालेले की, ‘माझा नाना पाटेकर यांना सपोर्ट आहे, एवढंच नाही. तर मी नाना पाटेकर यांच्या बाजूने उभा आहे. आय सपोर्ट नाना पाटेकर ‘जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी’ नाना पाटेकर हा एक थिएटर आर्टिस्ट, मराठी आणि हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता आहे. या अभिनेत्याची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या कुणी बाईंनी हे आरोप केले आहेत, या बाईंना अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळालं आहे, त्यांचा काही संबंध आहे का?, मध्येच या बाईंनी मनसेचं नाव का घेतलं?’ असा सवालही मकरंद अनासपुरे यांनी केलेला.
‘या बाई मीडियाकडे न जाता, सुरूवातीलाच न्यायालयात का गेल्या नाहीत, आता मीडियात नको नको ते बोलून झाल्यावर, तुम्ही आताच पोलीस स्टेशन आणि न्यायालयात जात आहात, ते आधी का गेले नाहीत. या प्रकरणामागे बोलविता धनी कुणी वेगळाच आहे का? ते देखील पाहिलं पाहिजे. नाना पाटेकर यांचा स्वभाव कठोर आहे, ते रागीट आहेत हे माहित आहे, पण तो माणूस वाईट नाही, एका कलावंताने हिंदीत मोठं नाव केलं आहे, खंबीरपणे बॉलिवूडमध्ये उभे आहेत. यवतमाळच्या शेतकरी महिलांनी उस्फूर्तपणे त्यांच्या बाजूने मोर्चा काढला, तेव्हा उस्फूर्तपणे सर्वांनी नक्कीच नाना पाटेकर यांच्याबाजूने बोलण्याची गरज आहे.’ असंही मकरंद शेवटी म्हणाले होते. ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत मकरंद अनासपुरे बोलत होते.