अतिशय अश्लील आणि…, मलायका अरोराचा डान्स पाहून सर्वत्र संतापाची लाट, तुम्हीही म्हणाल…
Malaika Arora Trolled: अतिशय अश्लील आणि..., अभिनेत्री मलायका अरोरा हिचा अश्लील डान्स पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट, अभिनेत्री ट्रोल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिची चर्चा...

Malaika Arora Trolled: अभिनेत्री मलायरा अरोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील मलायका एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मलायका अरोरा आणि रॅपर हनी सिंग यांचं ‘चिलगम’ गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी मलायका हिच्यावर निशाणा साधला आहे. सांगायचं झालं तर, “चिलगम” हे गाणं हनी सिंगच्या आगामी अल्बम “51 ग्लोरियस डेज” चा भाग आहे. या गाण्याचा टीझर 7 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला.
गाण्याच्या टीझरमध्ये मलायका हिचा दमदार डान्स दिसून आला. मलायका हिची हनी सिंग याच्यासोबत केमेस्ट्री देखील दिसली. पण अनेकांनी यंदा मलायका हिचा डान्स आवडला नाही… अनेकांनी गाण्याच्या कोरिओग्राफीवर टीका केली आणि मलायकाच्या डान्सला”अश्लील” म्हटलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.
सांगायचं झालं तर, ‘चिलगम’ गाण्याचा एक BTS व्हिडीओ रेडिटवर सर्वत्र व्हायरल होत आहे. याच व्हिडीओमुळे वादाला सुरुवात झाली. व्हिडीओमध्ये मलायका जीभ बाहेर काढत हनी सिंग याच्याकडे थिरकत येते… गाण्यात हा भाग विनादी अंदाजात दाखवण्यात आला आहे. पण सोशल मीडियावर सध्या मलायका हिची चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
गाण्याचा टीझर पाहिल्यानंतर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मलायका निक्की मिनाझ का होत आहे?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मलायका हे काय करत आहे.’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘प्रश्न तिच्या वयाचा नाहीये, ती गाण्यात अश्लील दिसतेय.’ एकाने म्हटले, ‘ती आता स्ट्रिपर झाली आहे.’ पण सोशल मीडियावर वाद टोकाला पोहचल्यानंतर, गाण्याचा टीझर इंस्टाग्रामवरून हटवण्यात आला आणि आता तो यूट्यूबवर नाही.
मलायका अरोरा
अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं तर, मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायका हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात येतं. आता देखील अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चर्चेत आहे.
अभिनेता अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर मलायका हिने अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केली. पण दोघांचं नातं फार काही टिकलं नाही. काही महिन्यांपूर्वी ‘मी आता सिंगल आहे…’ अशी घोषणा अर्जुन कपूर याने केलेली… तेव्हा देखील मलायकाचं खासगी आयुष्य चव्हाट्यावर आलं होतं.
