
जवळपास चार ते पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. या दोघांनी ब्रेकअपबाबत जाहीर प्रतिक्रिया दिली नसली तरी अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यांमुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं स्पष्ट झालं. माध्यमांसमोर नेहमी एकमेकांसोबत दिसणारे मलायका आणि अर्जुन हे एका फॅशन शोदरम्यान मात्र वेगवेगळे बसले होते. इतकंच नव्हे तर अर्जुनसमोरून जातानाही मलायकाने त्याच्याकडे पाहिलासुद्धा नव्हतं. या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अर्जुनसोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायका मालदिवला एकटीच फिरायला गेली होती. सोशल मीडियावर दोघं अप्रत्यक्षपणे नात्याविषयी आणि इतर गोष्टींविषयी पोस्ट शेअर करत आहेत. अशातच मलायकाने ब्रेकअपचं दु:ख विसरण्यासाठी आता थेट महिनाभराची प्लॅनिंग शेअर केली आहे.
‘यापुढे तुम्ही तुमच्या महिनाभराच्या शेड्युलमध्ये खालील गोष्टी समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा,’ असं या पोस्टवर लिहिण्यात आलं आहे. त्यात या गोष्टींचा समावेश आहे.
मलायका आणि अर्जुनने 2018 मध्ये त्यांचं रिलेशनशिप जाहीर केलं होतं. मलायकाच्या 45 व्या वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट लिहित अर्जुनने प्रेम व्यक्त केलं होतं. 19 वर्षांच्या संसारानंतर मलायका आणि अरबाज यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला होता. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. अर्जुनसोबतच्या नात्यामुळे मलायका अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता दोघं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये दुरावा आल्याचं पहायला मिळालं.
अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी मलायका यावर्षी मात्र सेलिब्रेशनमध्ये कुठेच दिसली नव्हती. तिने अर्जुनसाठी कोणतीही पोस्टसुद्धा लिहिली नव्हती. मात्र अर्जुनसाठीचे जुने पोस्ट अजूनही मलायकाच्या अकाऊंटवर पहायला मिळतात. मलायका आणि अर्जुनच्या जवळच्या व्यक्तीने एका मुलाखतीत त्यांच्या ब्रेकअपचा खुलासा केला होता. तेव्हापासून या दोघांच्या नात्याविषयी चर्चांना उधाण आलं होतं. ‘मलायका आणि अर्जुन यांचे मार्ग जरी वेगळे झाले तरी ते याबाबत एकमेकांवर कधीच आरोप करणार नाहीत. ते त्यांच्या नात्याचा कायम आदर करतील’, असं त्या जवळच्या व्यक्तीने ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.